Rudreshwar Temple : सातेरकर गटाचे नमते; हरवळेतील वाद शमला,सामोपचाराने पडदा

Rudreshwar Temple : पुन्हा वाद न घालण्याची ग्वाही
Rudreshwar Temple
Rudreshwar Temple Dainik Gomantak

Goa News :

हरवळे येथील श्री रूद्रेश्वर देवस्थान समिती आणि वरचे हरवळे येथील सातेरी देवस्थान समिती गटांमध्ये महाशिवरात्रीनंतर रविवारी (ता. ७) पालखी सोहळ्यात झालेल्या वादाच्या प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.

सातेरकर गटाने उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर यापुढे मंदिरातील उत्सवांमध्ये कोणताही वाद किंवा गोंधळ न घालण्याचे मान्य केले आहे. अखेर हा विषय सामोपचाराने मिटल्याचे दोन्ही गटांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली रूद्रेश्वर देवस्थान समिती व सातेरी देवस्थान समिती यांच्यात संयुक्त बैठक होऊन चर्चा झाली.

मासिक पालखीवेळी गोंधळ व वाद निर्माण झाला होता. यावर उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी संयुक्त बैठक घेतली व दोन्ही गटांमध्ये चर्चा झाली. त्यात रूद्रेश्वर मंदिराच्या सण-उत्सवांमध्ये सातेरकर गटाचे नमते; सातेरकर गटाला असलेले पारंपरिक हक्क आम्हाला मिळणार, तसेच देवस्थान समिती त्यांचे आहे ते कार्य करणार आहे.

Rudreshwar Temple
South Goa: 48 तासांत उत्तर द्या! निवडणूक अधिकार्‍याने आप आमदाराला कारणे दाखवा नोटीस का बजावली?

या बैठकीत सर्व प्रकरणे मिटली असून यापुढे रूद्रेश्वर देवस्थान समितीबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे, असे यावेळी सातेरकर गटाचे गीतेश मळीक यांनी सांगितले. देवस्थानाबाबत राजकारण नको : माडकर सध्या निवडणुकीचा काळ असल्याने राजकारण तापले आहे.

सध्याच्या राजकारणाला देवस्थानच्या व्यासपीठावर स्थान नाही. देवस्थान व राजकारण हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे या विषयाचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक यांच्याबाबत काहीही बोलू नये. या बैठकीत झालेला विषय समाजातील नेते, वकील, लोकांसमोर मांडणार आहोत, असे यशवंत माडकर म्हणाले.

गैरसमजातून मुख्यमंत्र्यांवर ठपका या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा अजिबात सहभाग नाही. सातेरकर गटातील लोकांवर कारवाई होत नसल्याने सर्वांनाच त्या लोकांना कोणत्या तरी बड्या राजकीय नेत्याचा पाठिंबा असल्याचे वाटत होते; परंतु आज हा विषय सर्वांसमोर उघड झाला असल्याने या विषयात मुख्यमंत्री किंवा इतर कोणाचाही पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे यशवंत माडकर म्हणाले.

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सहभाग नाही!

दोन्ही गटांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन आजच्या बैठकीतील तोडग्याविषयी खुलासा केला. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन सर्व परिस्थिती दोन्ही गटांसमोर मांडण्यात आली. या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे नाव गोवण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांचा सातेरकर गटाला पाठिंबा असल्याचे आरोप झाले होते; परंतु आजच्या बैठकीनंतर या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सहभाग नसल्याचे दोन्ही गटांकडून स्पष्ट करण्यात आले. यापुढे कोणताही वाद होणार नाही, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

‘तो’ दावा फोल

या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सातेरकर गटाला पाठिंबा असल्याचा दावा फोल असल्याचे आम्ही यापूर्वीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. सावंत किंवा खासदार श्रीपाद नाईक यांचा पाठिंबा नसल्याचे आम्ही पुन्हा सांगत आहोत, असेही गीतेश मळीक यांनी सांगितले.

पालखी रूद्रेश्वर समितीची

यावेळी रूद्रेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर म्हणाले की, या बैठकीत सातेरकर गटाने मंदिरातील उत्सवांमध्ये वाद किंवा गोंधळ न घालण्याचे मान्य केले आहे. तसेच मासिक पालखी ही रूद्रेश्वर समिती, महाजनांची आहे. त्यावर आपला कोणताही हक्क नसल्याचे त्यांनी खास करून नमूद केले आहे. त्यांना मंदिरात येऊन दर्शन घेण्यास काहीच हरकत नाही.

सातेरकर गटाने यापुढे वाद घालणार नाही, असे सांगितले आहे. हा विषय केवळ हरवळे व साखळीपुरताच मर्यादित राहिलेला नाही. याविषयी संपूर्ण भंडारी समाजाच्या लोकांना आम्ही हाक दिली होती. त्यांच्यापर्यंत हा तोडग्याचा विषय पोहोचविणे आमचे कर्तव्य आहे

- सुभाष किनळकर, सचिव, रूद्रेश्वर देवस्थान समिती.

भाऊंबाबतचे वक्तव्य वैयक्तिक : माडकर

खासदार श्रीपाद नाईक यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हे माझे वैयक्तिक आहे. नाईक हे आमच्या समाजाचे नेते असून या देवस्थानचे महाजन आहे. तरीही त्यांनी आम्हाला कोणताही आधार दिला नसल्याने मी त्यांच्या विरोधात वैयक्तिकरित्या बोललो होतो. याला आता राजकीय रंग देऊ नये, असे यशवंत माडकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com