Sasashti News : सिवेज पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण!

दोन किमी अंतरावर एकूण २० भगदाडे आहेत, त्यातील १५ चे काम पूर्ण झाले
Pipeline
Pipeline Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी : मडगाव शहरातील कोलवा सर्कल ते दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळपर्यंतच्या रस्त्यावर सिवेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. मात्र, एप्रिल अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काम पूर्ण झाल्यावर ही वाहिनी सिवेजच्या मुख्य पाईपलाईनला जोडली जाईल. त्यामुळे शेतांमध्ये किंवा रस्त्याच्या बाजुला झिरपणारे सांडपाणी बंद होईल. एका वर्षापूर्वी सिवरेज ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने हे दोन किलोमीटर अंतराचे काम सुरू केले होते.

Pipeline
Mahadayi Water Dispute: भाजपने म्‍हादईप्रश्‍‍नी शहांच्‍या सभेत भूमिका स्‍पष्‍ट करावीच

गटारामध्ये उतरण्यासाठीची केवळ दोन मोठ्या भगदाडाचे काम पूर्ण होणे बाकी आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते स्वप्निल देसाई यांनी सांगितले. या दोन किमी अंतरावर एकूण २० भगदाडे आहेत, त्यातील १५ चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

Pipeline
Mahadai Water Dispute: भाजपने शहांचे विधान चुकीचे सिद्ध करावे-पणजीकरांचा टोला

तक्रारींना पूर्णविराम

या रस्त्यावरील वाहतुकीमुळे कामाला अडथळा जाणवतो व त्यासाठी काम वेळेत पूर्ण करायला मिळत नाही, अभियंते स्वप्निल देसाई यांनी म्हणाले. केवळ जिल्हा इस्पितळाजवळील भगदाडाचे काम बाकी आहे असे त्याने सांगितले. या भागामध्ये सिवेजलाईन नसल्यामुळे सांडपाणी शेतामध्ये जात असत. त्यामुळे अनेक तक्रारी येत असत. हे काम पूर्ण झाल्यावर त्याला पुर्णविराम मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa postmen daily wage
Vaibhavi IIT success story
Goa Shack Licenses Before October
Ponda Municipality Golden Jubilee
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com