Sasashti News : जगातील शेकडो राष्ट्रांना योगामध्ये वाटतो रस : आमदार दिगंबर कामत

Sasashti News : मडगावात विविध ठिकाणी योग कार्यक्रम
Sasashti
Sasashti Dainik Gomantak

Sasashti News :

सासष्टी, मडगावात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कोकण रेल्वे स्थानकावरील योग दिवसाच्या कार्यक्रमात मडगावचे आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, नगरसेवक दामोदर वारक तसेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

या प्रसंगी आमदार कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली योगाचे महत्त्व संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत मांडले व योगाचा प्रसार जगभर करण्याचे आवाहन केले. आता जगातील शेकडो राष्ट्रे योगामध्ये रस दाखवत आहेत. योग केल्याने शरीर व मनाला चालना मिळते. आध्यात्मिक विकास साधता येतो असे ते म्हणाले. या वेळी उपस्थितांनी वेगवेगळी आसने व प्राणायाम केले.

Sasashti
अमेरिकेने दिला मोठा दिलासा, H-1B अन् वर्क व्हिसा अर्जदारांना मुलाखतीतून मिळणार सूट

नियमित योगा करणे आवश्‍यक : तुयेकर

दक्षिण गोवा भाजप कचेरीतही योग दिवस साजरा करण्यात आला. या वेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, दक्षिण गोवा भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर, सचिव सत्यविजय नाईक, जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक तसेच असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

उल्हास तुयेकर यांनी सांगितले की, योग केवळ २१ जून रोजी करून काहीही साध्य होणार नाही. योग हा नियमित करणे फायदेशीर आहे. त्यामुळे शरीर सदृढ व निरोगी बनते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com