Sasashti News : दहा वर्षांत देशाची उत्तुंग प्रगती; विश्‍‍व हिंदू परिषद

Sasashti News :देशाची ही प्रगती अशीच यापुढे सुरू रहावी यासाठी देशाला खंबीर नेतृत्व देणाऱ्या व हिंदू संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या पक्षाच्‍या उमेदवाराला मतदान करा, अशी हाक विश्‍‍व हिंदू परिषदेच्या गोवा शाखेतर्फे आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्‍यात आली.
Sasashti
Sasashti Dainik Gomantak

Sasashti News :

सासष्टी, गेल्या दहा वर्षांत भारताने जी सर्वांगीण प्रगती साधलीय, त्‍यास तोड नाही. देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यावर पहिल्या ६० वर्षांत जे साध्य झाले नाही, ते गेल्‍या दहा वर्षांत साध्य झाले आहे.

देशाची ही प्रगती अशीच यापुढे सुरू रहावी यासाठी देशाला खंबीर नेतृत्व देणाऱ्या व हिंदू संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या पक्षाच्‍या उमेदवाराला मतदान करा, अशी हाक विश्‍‍व हिंदू परिषदेच्या गोवा शाखेतर्फे आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्‍यात आली.

विश्‍‍व हिंदू परिषद प्रत्यक्ष राजकारणात नसली तरी राष्ट्रकारणात आमचा निश्र्चितच सहभाग असतो. देशाच्या हिताचा विचार करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे गोवा शाखेचे मंत्री मोहन आमशेकर यावेळी सांगितले. तसेच सर्व गोमंतकीयांनी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहनही त्‍यांनी केले. जो पक्ष देशाचे हित पाहील, संरक्षण करेल, देश मजबूत करेल व देशाला प्रगतिपथावर नेईल अशाच पक्षाला मतदान करणे गरजेचे आहे, असे आमशेकर म्‍हणाले.

Sasashti
Goa News : मुलांना आनंदी वातावरणामध्ये शिकवायला हवे; जयश्री बाविस्कर यांचे प्रतिपादन

स्वातंत्र्यानंतर ५० ते ६० वर्षांत केवळ लूटमार झाली. हिंदू संस्कृतीचे खच्चीकरण झाले. देशाच्या घटनेत १२० दुरुस्त्या करण्यात आल्या, ज्‍यामुळे धर्मांतराला वाव मिळाला. अनेक कायदे तयार करून हिंदूची मंदिरे ताब्यात घेण्यात आली. बहुसंख्याकांकडून कर घेऊन अल्पसंख्याकांना त्याचा फायदा मिळवून दिला. पूर्वी देशात दहशतवाद पसरला होता. मात्र गत दहा वर्षांत त्याचा लवलेशही दिसत नाही, असेही आमशेकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी प्रवास नायक, संतोष नाईक, प्रमोद सांगोडकर व डॉ. हिरेमठ उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com