Sasashti News : आपल्या शाळेला विसरू नका : सदानंद शेट तानावडे

Sadanand Tanavade : महिला नूतन विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव
 Sadanand Tanavade
Sadanand TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी, व्यक्तीची जडणघडण शाळेत होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे जिवनावह योग्य दिशा मिळते. त्यामुळे ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो त्या शाळेला विद्यार्थ्यांनी कधीही विसरू नये. मोठे झाल्यावर त्या शाळेसाठी आपले योगदान दिले पाहिजे, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

कोंब, मडगाव येथील समाज सेवा संघ संचालित महिला नूतन विद्यालयातील दहावीतील 51 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्यात तानावडे बोलत होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचाही सदैव आदर करावा. आपल्यासाठी त्यांनी काढलेले त्रास सदैव स्मरावे व म्हातारपणात त्यांना आधार द्यावा, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचाही गौरव करणे उचित ठरेल, असा सल्ला त्यांनी दिला.

आपण ज्या शाळेत शिकलो, त्या पिर्ण येथील शाळेचा आपण गेली ३० वर्षे अध्यक्ष असून केजी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आपण केली आहे. सध्या या शाळेत १२०० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महिला नूतन विद्यालयाने गेल्या ९० वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केल्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुदीन नायक यांनी स्वागत केले.

२०२४ साली दहावीत शाळेतील १३५ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिला व १०० टक्के निकाल लागला. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त टक्के गुण घेतले, ६०विद्यार्थी विशेष श्रेणीत तर ५१ विद्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले.

सचिव सनत पै रायतुरकर यांनी पाहुण्यांची ओळख केली तर खजिनदार सुनील नाईक यांनी

आभार प्रदर्शन केले.

अनुदानित शाळांकडे सरकारचे दुर्लक्ष : नायक

शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. सरकारी शाळांवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत, मात्र अनुदानित शाळांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुदीन नायक यांनी यावेळी सांगितले.

माजी शिक्षकांचा सत्कार

माजी शिक्षिका जेनिफर परेरा व विद्या लोटलीक यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी विद्यालयातील रोबोटीक, कंप्युटर प्रयोगशाळांची पाहणी केली व विद्यालयाची प्रशंसा केली.

खासदार निधीतून कंप्युटर प्रयोगशाळेसाठी अनुदान देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

 Sadanand Tanavade
C K Naidu Trophy: गोव्याच्या युवा संघाची उडाली दाणादाण; नायडू करंडक स्पर्धेत रेल्वेचा शानदार विजय

मैदानी खेळांवर भर द्या

सध्या मुले मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. शिक्षणाबरोबरच खेळही महत्वाचा आहे. या मुलांना मैदानावर खेळण्यासाठी पाठवावे. त्याचा शारिरीक व्यायाम झाल्यास मानसिकताही मजबूत होईल. मोबाइलपासून आपल्या मुलांना जेवढे दूर ठेवता येईल, तेवढे दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही तानावडे यांनी यावेळी पाल्यांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com