Sasashti News : अपघातग्रस्त दुचाकीस्‍वाराला मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात

Sasashti News : या घटनेने मुख्यमंत्री सावंत यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. अपघातस्थळी मुख्यमंत्री स्वत: सहकार्य करत असलेला फोटो, व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sasashti
SasashtiDainik Gomantak

Sasashti News :

सासष्टी, घोगळ-मडगाव येथे काल बुधवारी रात्री एका दुचाकीस्‍वाराचा स्‍वयंअपघात होऊन तो रस्त्याच्या बाजूला कण्‍हत पडला होता.

त्‍याचवेळी तेथून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ताफा जात होता. मुख्यमंत्र्यांनी अपघात झाल्याचे पाहून लागलीच ताफा थांबवला व अपघातग्रस्त व्यक्तीची विचारपूस केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर रुग्‍णवाहिकेचीही वाट न पाहता आपल्या ताफ्यातील पोलिस जीपमध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला बसवून त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पोहोचविण्याचा आदेश दिला.

या घटनेने मुख्यमंत्री सावंत यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. अपघातस्थळी मुख्यमंत्री स्वत: सहकार्य करत असलेला फोटो, व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sasashti
Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

दरम्‍यान, यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी कित्येकदा अपघातग्रस्तांना मदत केल्याची उदाहरणे आहेत. गेल्‍या फेब्रुवारी महिन्यात ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेला संबोधित करून काणकोणहून परतत असताना बाळ्ळीत झालेल्या ट्रक अपघातातील व्यक्तींना त्यांनी असाच मदतीचा हात दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com