सर्वण येथील नैसर्गिक 'झर' नामशेष होण्याच्या मार्गावर, प्रवाह मंदावला; स्थानिक पंचायत व अन्य यंत्रणांनीही दुर्लक्ष केल्याने नाराजी

Sarvan natural spring extinction: औषधी गुणधर्म आणि नैसर्गिक जलस्रोत असलेली सर्वण गावातील नैसर्गिक ‘झर’ सध्या संकटात आली असून, ही झर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
Sarvan natural spring extinction
Sarvan natural spring extinctionDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: औषधी गुणधर्म आणि नैसर्गिक जलस्रोत असलेली सर्वण गावातील नैसर्गिक ‘झर’ सध्या संकटात आली असून, ही झर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गाचे वरदान आणि गावचे वैभव असलेल्या या ‘झरी’च्या तोंडावरील कठडा खचला असून, त्यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. झरीतील पाणीही आटले असून, झरीवर प्रदूषणाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या झरीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डिचोली तालुक्यातील सर्वण गावातील श्री श्यामपुरुष मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर ही नैसर्गिक झर आहे. वाठादेव येथून या ‘झरी’चा उगम झाल्याचा जाणकारांचा दावा आहे.

स्थानिक पंचायत किंवा अन्य यंत्रणा ही झर वाचविण्यासाठी पुढे येत नसल्याने झरीचे अस्तित्व संकटात आले आहे. नैसर्गिक देणगी असलेल्या या झरीच्या संवर्धनासाठी वेळीच प्रयत्न झाले नाहीत, तर ही झर नामशेष होण्याचा धोका आहे.

Sarvan natural spring extinction
Goa Premier League: धेंपो क्लबची नाट्यमय मुसंडी; अंतिम फेरीत धडक, पणजी जिमखान्याला नमविले

झर औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध : ही नैसर्गिक झर औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. झरीतील पाण्याने आंघोळ केल्यास कातीचे विकार बरे होतात, असा जाणकारांचा दावा आहे. कातीचे विकार झालेले गावाबाहेरील काहीजण या झरीवर आंघोळीसाठी येत होते, मात्र आता ही झर प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. नऊ वर्षांपूर्वी जलस्रोत खात्याकडून या झरीची पाहणी करण्यात आली होती; मात्र झरीच्या संवर्धनासाठी पुढे कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत.

Sarvan natural spring extinction
Goa Bank Fraud: बँक मॅनेजरच निघाला भामटा! 64.25 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल, ग्राहकांच्या नावे परस्पर काढले कर्ज

स्थानिकांचीही झरीकडे पाठ

एकेकाळी, म्हणजेच २५-३० वर्षांपूर्वी, या झरीवर सदैव गजबज दिसून येत असे. गावातील लहानथोर मिळून बहुतांशजण आंघोळीसाठी या झरीवर जात होते. संध्याकाळच्या वेळी तर या झरीवर आंघोळीसाठी गर्दी दिसून येत होती.

मात्र झरीची देखभाल किंवा बांधणी करण्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने हळूहळू या झरीच्या प्रवाहावर परिणाम होत गेला. त्यातच दगड, माती, पालापाचोळ्यामुळे झर बुजत गेली. पाणीही प्रदूषित होत गेल्याने स्थानिकांनी हळूहळू या झरीकडे पाठ फिरवली. आता तर या झरीवर कोणीच जात नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com