
Advalpal Sarpanch Gajanan Palkar Removal
डिचोली: अडवलपाल पंचायतीचे सरपंच गजानन पालकर यांची अखेर सरपंचपदावरून उचलबांगडी झाली आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ४ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला.
अडवलपाल पंचायतीच्या पाचपैकी उपसरपंच मिळून ३ पंचसदस्यांनी गेल्या २८ नोव्हेंबर रोजी सरपंच गजानन पालकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी अविश्वास ठरावावर स्वाक्षरी नसलेला अन्य एक पंचसदस्यही ठरावाच्या बाजूने राहिला.
अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी आज (मंगळवारी) अडवलपाल पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीस उपसरपंच विनश्री गावकर यांच्यासह सुबत्ता सामंत, गीतेश गडेकर आणि शेखर परवार हे चार पंचसदस्य उपस्थित होते. तर पदच्युत सरपंच गजानन पालकर यांनी बैठकीकडे पाठ केली होती. अविश्वास ठरावावर चर्चा होऊन हा ठराव ४ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला, अशी माहिती मिळाली आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून गटविकास कार्यालयाचे अधिकारी प्रतापराव राणे यांनी जबाबदारी सांभाळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.