Ferry Service Problems: दोन जुन्या फेरीबोटी, हजारो प्रवासी अन् अनिश्चित सेवा; सारमानस-टोंक मार्गावर नवी बोट कधी?

Additional Ferry Boat Demand Goa: सारमानस-टोंक जलमार्गावरील फेरीसेवा वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
Additional Ferry Boat Demand Goa:
Ferry Service ProblemsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: सारमानस-टोंक जलमार्गावरील फेरीसेवा वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दोन दिवसांपूर्वीही या जलमार्गावरील एक फेरीबोट सलग चार दिवस नादुरुस्त राहिल्याने विद्यार्थी, कामगार आणि इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.एक

फेरीबोट बंद असल्याने दोन्ही बाजूंच्या फेरीधक्क्यांवर प्रवासी अडकून पडले होते. त्यामुळे या जलमार्गावरील फेरीसेवा सुरळीत करावी, अशी मागणी नियमित प्रवाशांनी केली आहे. सारमानस-टोंक जलमार्गावर दोन फेरीबोटी कार्यरत असून, त्या दोन्ही जुन्या झाल्या आहेत. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, फेरीबोटी वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना अनेकदा प्रतीक्षा करावी लागते.

Additional Ferry Boat Demand Goa:
Goa Tourism Safety: हॉटेल बुकिंगच्या नावाखाली फसवणूक? गोवा पोलिसांकडून सायबर सुरक्षा सल्ला जारी

ओहोटीच्या वेळी जलमार्गाच्या मध्यभागी भाट पडत असल्याने फेरीबोटी अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात फेरीसेवा बंद ठेवली जाते. त्यातच एखादी फेरीबोट नादुरुस्त झाल्यास प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढते. परिणामी, अनेकांना नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचणे कठीण होते, असे पिळगावचे माजी पंचसदस्य अनिल नाईक यांनी सांगितले.

सारमानस-टोंक जलमार्गावर वाहतूक करणाऱ्या दोन्ही फेरीबोटी जुन्या आहेत. त्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असतात. या जलमार्गावर नवीन फेरीबोटी सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. यापूर्वी आपण ही मागणी पंचायत तसेच नदी परिवहन खात्याकडे केली आहे. नवीन किंवा अतिरिक्त फेरीबोट सुरू केल्यास ही समस्या सुटेल. पंचायतीने या मागणीचा पाठपुरावा करावा.

- महेश वळवईकर, माजी सरपंच, पिळगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.