Goa Politics: सार्दिन यांना पाठिंबा नाहीच; आमदार विजय सरदेसाई

Goa Politics: माझ्या भूमिकेवर ठाम
Vijai Sardesai on Salary Certificate
Vijai Sardesai on Salary CertificateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics:

काँग्रेसने फ्रान्‍सिस सार्दिन यांना उमेदवारी दिली, तर त्‍यांनी माझा पाठिंबा गृहीत धरू नये, सार्दिन यांना उमेदवारी दिल्‍यास मी पाठिंबा देणार नाही, ही माझी भूमिका अजूनही कायम आहे. मी माझी भूमिका काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांना कळविली आहे. आता पुढे काय निर्णय घ्‍यायचा तो काँग्रेसने घ्‍यावा, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

विजय सरदेसाई यांनी ही भूमिका घेतल्‍यानंतर माणिकराव ठाकरे यांनी त्‍यांच्‍याशी चर्चा केली होती. सरदेसाई यांनी जे मत व्‍यक्‍त केले आहे, ते त्‍यांचे वैयक्‍तिक मत असे ठाकरे यांनी म्‍हटले होते. त्‍यानंतर सरदेसाई यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट करताना, काँग्रेस काय निर्णय घेते, ते पाहुया असे म्‍हणत या बाबतीतला सस्‍पेन्‍स कायम ठेवला होता.

आज फातोर्डा येथे विकासकामांचा शुभारंभ करताना सरदेसाई यांना त्‍यांच्‍या भूमिकेविषयी विचारले असता ते म्‍हणाले, फ्रांसिस सार्दिन यांना आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने उमेदवारी का देऊ नये, याचे जाहीर स्पष्टीकरण देण्यास माझी तयारी आहे.

Vijai Sardesai on Salary Certificate
Goa Shack: शॅकसाठी टीसीपी परवान्याची गरज नसेल; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सार्दिन यांनी फातोर्डा मतदारसंघात एका पैशाचे काम केलेले नाही. त्यांचेही फातोर्डात काही निवडक मतदार असतील, त्यांची सुद्धा त्यांनी कामे केली नाहीत. शिवाय त्यांनी गोव्याचे खास करून दक्षिण गोव्यातील केंद्र सरकारच्या आख्यत्यारितीत येणारे एकही प्रश्र्न संसदेत मांडलेला नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

मी कॉंग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची त्यांच्या विनंतीवरून भेट घेतली व त्यांना माझी बाजू सांगितली आहे. दक्षिण गोव्यात कॉंग्रेस आपला उमेदवार ठेवणार. जिंकला तर कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल. त्यात आपण का हस्तक्षेप करावा? असा प्रश्र्न करून सरदेसाई यांनी सांगितले, की जर सार्दिन यांना उमेदवारी दिली, तर आमचे काम सोपेच होईल. आम्हांला कामच करावे लागणार नाही, असे ते म्‍हणाले.

Vijai Sardesai on Salary Certificate
CM Pramod Sawant: देशभरात ‘सीएए’ लागू; केंद्राकडून अधिसूचना जारी

मोदींचे आभार...

भारतीय जनता पक्षाने पक्षांच्या नेत्यांवर सक्रिय राजकारणासाठी वयोमर्यादा तरी घातली आहे. त्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले पाहिजेत, असे सांगून सरदेसाई म्हणाले, उतार वयात काही लोकांना राजकारणात सक्रिय राहण्यासाठी एवढा खटाटोप, भावनिक आवाहन का करावे लागते, याचा अर्थच समजत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे त्या मानाने चांगले आहेत. त्यांचा आदर्श या राजकारण्यांनी घ्यावा, असेही सरदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com