Vijay Sardesai
Vijay Sardesai Dainik Gomantak

गोमंतकीयांना 80 टक्के नोकरी राखीवतेसाठी सरदेसाई यांचे प्रयत्न

अन्यथा गोव्यातील युवकांवर नोकरी शोधण्यासाठी परराज्यात जाण्याची पाळी येणार
Published on

मडगाव : गोव्यातील प्रत्येक खासगी उद्योग व अन्य आस्थापनात गोमंतकीयांना 80 टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याची सक्ती करणारे एक खासगी विधेयक गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडणार असून या संबंधीची नोटीस त्यांनी आज विधिकार खात्याला दिली.

Vijay Sardesai
कोमुनिदाद कायदा दुरुस्‍तीस समित्यांचा कडाडून विरोध

गोव्यातील प्रत्येक खासगी उद्योग, संस्था, सोसायट्या, प्रतिष्ठापने व अन्य आस्थापनात गोमंतकीयांना 80 टक्के नोकऱ्या देणे बंधनकारक करण्याची तजवीज या विधेयकात असून ही आस्थापने या तरतुदींचे पालन करतात की नाही हे पाहण्यासाठी खास अधिकारणी नेमण्याची तरतूद या विधेयकात आहे.

याबद्दल बोलताना विजय सरदेसाई म्हणाले, सध्या गोव्यात स्थानिक युवक मोठ्या प्रमाणावर बेकार असून या विधेयकाद्वारे त्यांना रोजगाराची शास्वती मिळू शकेल. हे विधेयक काळाची गरज असून अन्यथा गोवेकरांना नोकरी मिळविण्यासाठी बाहेरच्या राज्यात जाण्याची पाळी येईल.

या आस्थापनांना आवश्यक असलेले मनुष्यबळ राज्यात नसल्यास त्यांनी येथील युवकांना त्यासाठी प्रशिक्षण देऊन तयार करावे अशी तजवीज असून यासाठी जर कोणताही प्रयत्न न करता त्या आस्थापनांनी राज्या बाहेरून मनुष्यबळ आणले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतुद या विधेयकात असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com