Sara Khan Case in Goa : डॉक्टरांकडून चौकशीला परवानगी नाहीच; पोलिसांची पंचतारांकित हॉटेलमध्ये झाडाझडती

अमली पदार्थांचे अतिसेवन केल्याप्रकरणी सारा खान आणि त्यांचा सहकारी मित्र डॉ. अभिषेक सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.
Sara Khan Case in Goa
Sara Khan Case in GoaDainik Gomantak

Sara Khan Case in Goa : अमली पदार्थांचे अतिसेवन केल्याप्रकरणी सारा खान आणि त्यांचा सहकारी मित्र डॉ. अभिषेक सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचे गोव्यात वास्तव्य असलेल्या सिकेरी येथील पंचतारांकित हॉटेलच्या रुमची गुरुवारी सकाळी कळंगुट पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी फॉरेन्सिक विभागाच्या पथकासमवेत तपासणी केली. यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक पथकासमवेत उपस्थित होते.

दरम्यान या तपासणीत पोलिसांच्या हाती नेमकं काय लागले याची मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मंगळवारी रात्री हणजूण-वागातोर येथील एका नाईट क्लबमध्ये डिनर पार्टीवेळी सारा खान यांनी मादक पदार्थांचे अतिसेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या सारा यांच्यावर दोनापावला येथील एका नामांकित रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sara Khan Case in Goa
Goa Crime Case: सारा खान ड्रग्स प्रकरणात सहकाऱ्याचीही होणार चौकशी

दुसरीकडे कळंगुट पोलिसांकडून याप्रकरणात दिल्लीस्थित सारा खान तसेच उत्तर प्रदेश (वाराणसी) येथील डॉ. अभिषेक सिंग तसेच अज्ञात ड्रग्स पेडलर यांच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारा खानचे कुटुंबीय सध्या गोव्यात पोहोचल्याची माहितीही पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी दिली आहे. 

कळंगुट पोलिस पथकाकडून दोनापावल येथील त्या इस्पितळाला भेट देत संशयित सारा खान यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तेथील डॉक्टरांनी त्या बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांची चौकशी करण्याची मंजुरी दिली नाही, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com