Fatorda: ‘सां जुझे दी आरियाल’चा टेकडी कापणीला विरोध

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास विचारात न घेता डोंगरी भागाचे सेटलमेंट झोनमध्ये रूपांतर कसे केले जात आहे, असा सवालही ग्रामस्थांनी प्राधिकरणाकडे केला होता.
Fatorda | Sao Jose de Areal
Fatorda | Sao Jose de ArealDainik Gomantak

Fatorda: टेकडी कापणीला विरोध करण्याच्या भूमिकेवर ठाम राहून सां जुझे दी आरियालच्या ग्रामपंचायतीने आता त्यांचे पर्यावरण नष्ट होऊ नये म्हणून सरकारला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याप्रश्नी सरकारने आमच्या बाजूने राहावे किंवा पर्यावरण नष्ट करणाऱ्यांचे समर्थन करावे. मात्र, आमचा टेकडी कापणीला विरोध कायम असणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

सरपंच जॉयसी डायस म्हणाल्या की, पंचायतीच्या हद्दीतील टेकडी तोडण्याचे प्रकार रोखण्यासाठी पंचायत कोणतीही कसर सोडणार नाही.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की गावात मोठ्या प्रमाणात टेकड्या तोडण्यात येत आहेत. या कामाला स्थानिक पंचायत सदस्य आणि येथील रहिवाशांनी टीसीपीकडे हे काम तत्काळ थांबविण्याचा आदेश जारी करण्याची मागणी केली आहे.

प्रकल्पाच्या प्रवर्तकांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ नगररचनाकारांना निवेदन दिले आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास विचारात न घेता डोंगरी भागाचे सेटलमेंट झोनमध्ये रूपांतर कसे केले जात आहे, असा सवालही ग्रामस्थांनी प्राधिकरणाकडे केला होता.

Fatorda | Sao Jose de Areal
Goa Drug Case: मागील वर्षात गोव्यात ड्रग्ज प्रकरणांत मोठी वाढ, आकडा ऐकून बसेल धक्का

याप्रकरणी आम्ही आमचा आक्षेप आधीच नगर नियोजन विभागाकडे सादर केला आहे. आम्हाला प्राधिकरणाने काम थांबविण्याचे आदेश जारी करावेत आणि टेकडी कापण्यासाठी दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात, अशी आमची मागणी आहे. - जॉयसी डायस, सरपंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com