Panaji News : सांतिनेजमधील ‘ते’ बांधकाम वाचवण्याचाच खटाटोप; ‘जीसुडा’चे अभय

Panaji News : ‘हमारा स्कूल’जवळील सरकारी जागेत असेलल्या बांधकामांना संरक्षण देण्यासाठी आमदारापासून सर्वजण सरसावल्याची चर्चा आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, सांतिनेजमधील वेलनेस फार्मसीसमोरील मधुबन कॉम्प्लेक्स आणि काकुलो मॉलकडे जाणाऱ्या जोड रस्त्याच्या तिठ्यावरील कथित बेकायदा बांधकाम हटवण्याच्या सूचना गोवा राज्य नगर विकास प्राधिकरण (जीसुडा)ला असतानाही त्याकडे खात्याच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

‘हमारा स्कूल’जवळील सरकारी जागेत असेलल्या बांधकामांना संरक्षण देण्यासाठी आमदारापासून सर्वजण सरसावल्याची चर्चा आहे.

Panaji
Water Sports In Goa: जलक्रीडा ऑपरेटर्सचे होणार लवकरच ऑडिट, किनारपट्टी भागात पर्यटन खात्याकडून सुरक्षा उपाययोजना

महापालिकेचा परवाना नसताना नूतनीकरण करून गाळे उभारणाऱ्या येथील व्यावसायिकाने रस्त्याच्या बाजूची जागाही बांधकामात ओढून घेतली आहे. शिवाय बीएसएनएलचा चेंबरही बांधकामाच्या खाली गेल्याची माहिती पुढे येत आहे. गाळे उभारल्यानंतर एका प्रतिष्ठीत मिठाई विक्रेत्याने ते भाड्याने घेतले.

त्या भाड्यापोटी संबंधित मालकाला लाखो रुपये मिळणार होते. तिथे ज्याचे पूर्वी दुकान होते, त्या मालकाकडे महापालिकेचा व्यवसाय परवानाही नव्हता. तरीही तो व्यवसाय करीत होता.

Panaji
Private Jobs In Goa: नोकरभरतीतील त्रुटी उघड; सरकारी घोषणा कागदावरच

मधुबनकडून येताना डाव्या बाजूला असलेले हे बांधकाम रस्त्याला अडथळा ठरते. काम सुरू आहे. परंतु ते बांधकाम हटवण्यावर ‘जीसूडा’ रस दाखवत नसल्याने ते तिठ्ठ्यावर आहे.

दुकानमालकाचे ‘मनपा’त हेलपाटे

कथित बेकायदा बांधकाम उभारल्यानंतर ते भाड्याने देऊन लाखो रुपये मिळविण्याचा हा गोरख धंदा त्या दुकानमालकाला करावयाचा होता. प्राप्त माहितीनुसार इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे अध्यक्ष या नात्याने मुख्य सचिवांनी घेतलेल्या बैठकीत ते बांधकाम ‘जीसूडा’च्या अधिकाऱ्यांना हटविण्यास सांगितले होते.

त्याशिवाय जिल्हधिकाऱ्यांनाही सूचित करून कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु नंतर हे बांधकाम वाचविण्यासाठी सुरू खटाटोप झाला. सध्या या दुकानमालक महापालिकेत हेलपाटे घालत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com