Santa Cruz: दुर्दैवी! ग्रामसभेत वादग्रस्त विषयावर बोलले, खुर्चीत बसताना आला हृदयविकाराचा झटका; सांताक्रुझमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

Santa Cruz senior citizen heart attack: रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने त्यांना खासगी वाहनातून गोमेकॉत नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Santacruz gram sabha incident, senior citizen heart attack
Santacruz gram sabha incident, senior citizen heart attackDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ओलाव्हियो फर्नांडिस (७०) या ज्‍येष्‍ठ नागरिकांचा ग्रामसभेतच दुर्दैवी मृत्‍यू होण्‍याची घटना घडली. सांताक्रुझ ग्रामसभेत एका वादग्रस्त विषयावर आपली भूमिका मांडल्यानंतर खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागीच कोसळले.

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने त्यांना खासगी वाहनातून गोमेकॉत नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.रविवारी सकाळी साडेदहा वाजता सरपंच जेनिफर ओलिवेरा यांच्या अध्यक्षतेखाली सांताक्रुझची ग्रामसभा सुरू झाली. काही वेळानंतर फ्लॅट तसेच सदनिका हस्तांतरणावर २५ हजार रुपये शुल्क आकारण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू झाली.

या विषयावर वातावरण तापले होते. याचदरम्यान ओलाव्हियो फर्नांडिस यांनी उभे राहून शुल्काच्या निर्णयावर मत व्यक्त केले. ही चर्चा सुरू असतानाच काही पंचसदस्य तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी ओलाव्हियो फर्नांडिस यांचा अपमान केल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. फर्नांडिस यांना आपली बाजू अर्धवट सोडून आपल्या जागेवर बसावे लागले. खुर्चीवर बसत असतानाच ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळे ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला.

सुमारे २० मिनिटे रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागली, तसेच पणजीहून रुग्णवाहिका येणार असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती पंच इनासियो परेरा यांनी दिली. ग्रामसभांसारख्या सार्वजनिक बैठकींच्या वेळी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याची आवश्यकता असल्याची मागणी करण्‍यात आली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, सरपंच जेनिफर ओलिवेरा यांनी सांगितले की, घर व सदनिका हस्तांतरण शुल्क २५ हजार रुपये करण्याचा निर्णय हा सध्याच्या पंचायत मंडळाचा नसून तो मागील मंडळाने घेतला आहे.

Santacruz gram sabha incident, senior citizen heart attack
Santa Cruz: वेतन ठरले 24000, प्रत्यक्षात दिले कमी! सांताक्रुझ पंचायतीत 20.72 लाखांचा भ्रष्टाचार; न्यायालयाचे FIR नोंदवण्याचे आदेश

ग्रामसभांवेळी रुग्णवाहिका उपलब्ध असावी

ग्रामसभांना मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहत असल्याने कोणालाही कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठांचा विचार करून ग्रामसभांच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध असणे अत्यावश्यक असल्याचे मत एका पंचसदस्याने ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.

Santacruz gram sabha incident, senior citizen heart attack
Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

...तर फर्नांडिस वाचू शकले असते!

ओलाव्हियो फर्नांडिस कोसळल्‍यानंतर ग्रामस्‍थांनी तातडीने मोबाईलवरून रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सांताक्रुझ पंचायतीपासून गोमेकॉ रुग्णालय अगदी जवळ असतानाही रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी खासगी वाहनातून फर्नांडिस यांना गोमेकॉत नेले; पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्‍णवाहिका वेळेत आली असती तर कदाचित फर्नांडिस वाचू शकले असते, असे काही ग्रामस्‍थांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com