Sanquelim Municipal Council : साखळी पालिका आरक्षणावर 12 रोजी सुनावणी

साखळी पालिका प्रभाग फेररचनेला आव्हान दिलेल्या याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी आज याचिकादार व विद्यमान नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी खंडपीठाकडे मुदत मागितली.
Municipality of sanquelim
Municipality of sanquelimGomantak Digital Team
Published on
Updated on

Sanquelim Municipal Council on Reservation: साखळी पालिका प्रभाग फेररचनेला आव्हान दिलेल्या याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी आज याचिकादार व विद्यमान नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी खंडपीठाकडे मुदत मागितली. त्यामुळे ही सुनावणी १२ एप्रिलपर्यंत तहकूब झाली.

राज्य निवडणूक आयोगाने ही याचिका सादर केल्यानतंर प्रभाग आरक्षणची अधिसूचना जारी केल्याने त्यालाही आव्हान देण्यात येणार आहे.

याचिकेत म्हटले आहे, की राज्य निवडणूक आयोगाने साखळी पालिकेतील 13 प्रभागाऐवजी आता 12 प्रभाग करत फेररचना केली आहे. काही प्रभागांमधील भाग इतर प्रभागांत समावेश करताना भौगोलिक स्थिती याचा विचार केलेला नाही.

Municipality of sanquelim
Tips For Happy Married Life: नवरा बायकोचे नातं हवे असेल सकारात्मक तर फॉलो करा या सिंपल टिप्स

आयोगाकडून अधिसूचना जारी

ही याचिका खंडपीठात प्रलंबित असताना राज्य निवडणूक आयोगाने साखळी पालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची अधिसूचना जारी केली आहे. हे आरक्षण विरोधकांना लक्ष्य करून त्यांना निवडणूक लढविता येणार नाही, या उद्देशाने केले आहे.

त्यामुळे या आरक्षणालाही याचिकादाराने आव्हान देण्यासाठी आज मुदत मागितली. त्यामुळे बुधवारी याचिकेवर सुनावणी न घेता ती पुढे ढकलण्याची विनंती याचिकादारांनी खंडपीठाला केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com