Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Sanquelim: गेल्या उन्हाळ्यात साखळी शहरात सर्वत्र पाण्याची मोठी जलवाहिनी घालण्यासाठी खोदलेले चर पूर्वपदावर आणून रस्त्याच्या समतोल न करण्यात आल्याने सर्वत्र रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत.
Sanquelim Road Issue
Sanquelim Road IssueDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गेल्या उन्हाळ्यात साखळी शहरात सर्वत्र पाण्याची मोठी जलवाहिनी घालण्यासाठी खोदलेले चर पूर्वपदावर आणून रस्त्याच्या समतोल न करण्यात आल्याने सर्वत्र रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत. त्यात देसाईनगर येथे जाणारा चढण व उतरणीचा रस्ता तर अत्यंत धोकादायक स्थितीत असून रस्त्याची एक बाजू पूर्णपणे वाहून गेल्याने त्याचा धोका अधिकच वाढला आहे.

तीन दिवसांवर गणेशचतुर्थी असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा वाढणार आहे, अशावेळी या धोकादायक रस्त्यामुळे अपघात घडू नये, यासाठी वेळीच प्रशासनाने वा पालिकेने खबरदारी घ्यावी, अशी मागणी देसाईनगर भागातील लोकांनी केली आहे.

Sanquelim Road Issue
Stray Dogs Goa: कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लसीकरण मोहीम राबवा, गोवा ॲनिमल फेडरेशनची मागणी; वर्षभरात केवळ 15 हजार लसीकरण

गोकुळवाडी येथून देसाईनगर जाणारा रस्ता हा आधीच अरुंद आहे. त्यातच या रस्त्याच्या एका बाजूला चर खोदून मोठी जलवाहिनी घालण्यात आली होती. या जलवाहिनचे काम झाल्यानंतर वास्तविक सदर चर पूर्णपणे बुजवून त्यावर दगड मांडून रोलर फिरवणे आवश्यक होते.

Sanquelim Road Issue
Stray Dogs Goa: कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लसीकरण मोहीम राबवा, गोवा ॲनिमल फेडरेशनची मागणी; वर्षभरात केवळ 15 हजार लसीकरण

मात्र, तसे न होता सदर चर आहे तसेच सोडून कंत्राटदाराने उर्वरित कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मे महिन्यापासूनच सुरू झालेल्या पावसाने या रस्त्यावरील चरांमधील माती व दगड वाहून गेल्याने ते चर अधिक खोल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com