Mega Project : सांकवाळात मेगा प्रकल्पाला विरोध; स्थानिक आक्रमक

Mega Project : या मेगा प्रकल्पाला स्थानिक तसेच काही पंच सदस्यांचा विरोध असतानाही सांकवाळ पंचायतीने परवानगी दिली आहे.
Mega Project
Mega ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

Mega Project :

कुठ्ठाळी, सांकवाळ पंचायत क्षेत्रातील सांवरफोंड येथील सर्वे क्रमांक २५७/१, झोन सी-१, ओडीपी २०३० या ठिकाणी होऊ घातलेल्या मेगा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असतानाही काल या ठिकाणी झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या कामगारांना स्थानिकांनी हुसकावून लावले.

या मेगा प्रकल्पाला स्थानिक तसेच काही पंच सदस्यांचा विरोध असतानाही सांकवाळ पंचायतीने परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त संबंधितांकडे अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून आवश्यक परवाने घेतलेले नाहीत. तरीही जबरदस्तीने या ठिकाणी झाडांची काटछाट करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याने तो स्थानिकांनी सतर्कतेमुळे हाणून पाडला.

स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रथमेश शिंदे नावाच्या कंत्राटदाराने कामगारांना झाडांची कापणी करण्यासाठी पाठवले होते. मात्र कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प येथे होऊ देणार नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Mega Project
Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

६५० फ्लॅट, ७० व्हिला व ५ स्वीमिंग पूल!

हा प्रकल्प नोयडा, उत्तर प्रदेश येथील परमेश कन्स्ट्रक्शन कंपनी लि.तर्फे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनीने बांधकाम शुल्क म्हणून एकूण ६५,०१,४१५ रुपये ११ मार्च २००२४ रोजी पंचायतीच्या खात्यात जमा केले आहेत.

या ठिकाणी एकूण ६५० फ्लॅट व ७० व्हिला तसेच पाच स्वीमिंग पूल असणार आहे. पंचायत सचिव ओरविल वालीस यांच्या सहीनिशी या बांधकामास परवानगी दिली आहे. यामध्ये एमपीडीए /७,पी-१६५/२०२३-२०२४/१२५४ ता. ०२.०२.२०२४ चा उल्लेख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com