गोवा: विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याततील राजकारणाच्या समीकरणात मोठे बदल होताना दिसत आहेत. आज 'आप'च्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला. यातच शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युती (Shiv Sena-NCP alliance) आज जाहीर करण्यात आली आहे. (Sanjay Raut's statement during Shiv Sena NCP alliance announcement)
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी खासदार प्रफुल पटेल यांनी आज संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले, जागे साठी आमच्यात कोणतेही वाद नसतील, तशी वेळ आलीच तर शिवसेना एक पाऊल मागे जाईल किंवा राष्ट्रवादी एक पाऊल मागे जाईल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
संजय राऊतांचा त्या आमदारांवर निशाणा
पक्षाचं संघटन फक्त आयाराम आणि गयारामांनी मिळून बनत नाही. त्यासाठी काम करावं लागतं. "आयाराम गयाराम असतात तसंच गोव्यात आलेमाव-गेलेमाव असतात" असे विधान करत शिवसेना खासदार संजय राऊतांचा पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर निशाणा साधत चिमटा काढला
महाविकास आघाडीबाबत काँग्रेसची शून्य भूमिका
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करण्याची इच्छा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. मात्र काँग्रेसच्या शून्य भूमिकेमुळे या युतीमध्ये काही रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीचे (NCP) नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. या बैठकीत युती आणि निवडणुकीच्या फॉर्म्युल्याबाबत शिक्कामोर्तब होऊ शकतो, असे मानले जात आहे. संजय राऊत यांनी गोव्यात आम्ही जास्त जागांवर निवडणूक लढवणार नाही, असे विधान केले आहे. ते म्हणाले की, गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) चुरशीची लढत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.