उत्पल पर्रीकरांच्या समर्थनासाठी संजय राऊत सरसावले

उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन
Shivsena: MP Sanjay Raut
Shivsena: MP Sanjay Raut Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलासाठी शिवसेना खासदार संजय राऊत मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पणजी मतदारसंघातून लढण्यासाठी उत्पल पर्रीकर आग्रही असल्याचं स्पष्ट झालं होतं. उत्पल यांनी दिल्लीला जात भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचंही बोललं जात होतं. आता संजय राऊतांनीही उत्पल यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. (Sanjay Raut News Updates)

Shivsena: MP Sanjay Raut
रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे गोमंतकीयांसाठी आणखी एक आश्वासन

उत्पल पर्रीकर यांना जर गोवा विधानसभा निवडणूक पणजीतून लढवायची असेल तर भाजपच्या सर्व विरोधकांनी उत्पल यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला (BJP) होणारा विरोध आता संजय राऊतांनी गोव्यातही दाखवायला सुरुवात केली आहे. दरम्यान भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन संजय राऊतांनी (Sanjay Raut) याआधीही केलं होतं.

Shivsena: MP Sanjay Raut
चर्चिल आलेमाव राजकारणातून निवृत्त होणार?

उत्पल पर्रीकरांच्या उमेदवारीवरुन गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही उत्पल यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. केवळ मनोहर पर्रीकरांचा मुलगा म्हणून भाजपची उमेदवारी देता येणार नसल्याचं फडणवीस म्हणाले होते, तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बाबूश मोन्सेरात यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले होते. सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांनीही उत्पल (Utpal Parrikar) यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. कुंकळ्ळीकर यांनी मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर पणजीतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Social Media Ban
CM Pramod Sawant Inquiry Order
goa crime branch busts two fake call centers
Goa Mandovi River Casino Dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com