गोवा सरकारने गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन का नाही केले? संजय राऊतांचा थेट सवाल

संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला.
Sanjay Raut
Sanjay Raut Dainik Gomantak
Published on
Updated on

मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकरवरुन महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला घेरले आहे. '3 मे पर्यंत लाऊडस्पीकर हटवा अन्यथा 'मनसे स्टाइल' आंदोलनाला तयार राहा', असा स्पष्ट ईशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. (Sanjay Raut criticizes BJP and MNS)

Sanjay Raut
गोव्यात सरकारी पाण्याची दिवसाढवळ्या चोरी

काही लोकांनी त्यांना समर्थन दिले, तर काहींनी विरोधाचा सुर ओढला. या वादात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील उडी घेतली आहे. याबबात बोलताना राऊत यांनी गोव्याचा देखील उल्लेख केला.

Sanjay Raut
पेडे जंक्शन ठरतेय 'जीवघेणे'

राऊत म्हणाले, 'भाजप सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा केला होता, मात्र भाजपचे (BJP) सरकार असलेल्या गोवा राज्यानेच याला विरोध केला.' यावेळेस त्यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले, 'गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी यातून पळवाट काढली होती. भाजपने यावर काय केले? मी केंद्र सरकारला निवेदन करतो की केंद्र सरकारने लाऊडस्पीकरबाबत देखील राष्ट्रीय धोरण आखले पाहिजे. असे केल्यास लाऊडस्पीकरचा प्रश्न पूर्णपणे सुटेल.'

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'आम्हाला लाऊडस्पीकरबाबत कुणीही अक्कल शिकवू नये. बाळासाहेबांनी मुस्लिम समाजाचे प्रश्न चर्चेने सोडवले होते. केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण बनवून ते सर्व राज्यात लागू करावे.' राऊत यांनी यावेळेस नाव न घेता 'मनसे'वर बोचरी टीका केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com