Crime News: संजय नाईक खूनप्रकरणाला नवे वळण! खून होताना तिघे दारात, दोघे साक्षीदार

Sanjay Naik Murder Case: माशे येथील संजय नाईक खूनप्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
Sanjay Naik Murder Case
Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण: माशे येथील संजय नाईक खूनप्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. एडवर्ड मोंतेरो हा चिकन सेंटरमध्‍ये घुसून संजय यांचा धारदार हत्‍याराने खून करत असताना तिघेजण दारावर उभे होते. त्‍यातील एकाने तर एडवर्ड खाली पडला असताना त्‍याला उठविण्‍यास मदत केली होती. त्‍यामुळे आता चर्चेला ऊत आला आहे.

घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही बाब समोर आली आहे, ज्यात हे तिघेजण चिकन सेंटरच्‍या दारावर उभे राहून ही घटना पाहत होते. दोघांमध्ये झटापट सुरू असताना एडवर्ड खाली कोसळल्यानंतर त्यातील एकाने त्‍याला मदतीचा हात दिला होता. या तिघांपैकी दोघांना साक्षीदार करण्यात आले आहे.

Sanjay Naik Murder Case
FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

दरम्‍यान, मधुमेहाने ग्रस्त एडवर्ड मोंतेरोवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. २२ ऑक्टोबर रोजी त्‍याने चिकन सेंटरमध्ये घुसून धारदार शस्त्राने संजय नाईक यांचा खून केला होता. त्याच रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com