Sanguem News : सांगेत मुख्य रस्त्यावरील गटारांची सफाई गरजेची

Sanguem News : अवघ्या पाच दिवसांवर सांगे मिरॅकल्स चर्चचे मोठे फेस्त होणार असून फेस्ताच्या निमित्ताने संपूर्ण शहरात पाच-सात दिवस फेरी भरते.
Sanguem
SanguemDainik Gomantak

Sanguem News :

सांगे, नगरपालिकेने गटार उपसण्यास सुरवात केली आहे. सांगे शहरातील मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याचा अखत्यारित असल्यामुळे या रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारांतील माती, कचरा साफ करण्यात आलेला नाही.

अवघ्या पाच दिवसांवर सांगे मिरॅकल्स चर्चचे मोठे फेस्त होणार असून फेस्ताच्या निमित्ताने संपूर्ण शहरात पाच-सात दिवस फेरी भरते. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा फेरीची दुकाने थाटलेली असतात. त्यामुळे गटरांची सफाई लवकर होणे गरजेचे आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप मुख्य रस्त्यावरील गटारातील माती, पालापाचोळा काढला नसल्याने अवकाळी पावसामुळे पाण्यासोबत वाहून नेणारा कचरा मुख्य गटाराच्या तोंडावर साचत असल्यामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे फेस्ताच्या फेरीपूर्वी पालिका भागातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गटाराची साफसफाई करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.

Sanguem
Goa Public Service Commission: सरकारी नोकरीची संधी, गोवा लोकसेवा आयोगामार्फत 24 पदांची भरती

फेस्ताची पूर्वतयारी म्हणून सांगे पालिकेने सार्वजनिक बांधकाम खात्याला गटारे लवकर स्वच्छ करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास अवकाळी पावसाचे पाणी फेस्ताच्या फेरीवर परिणाम करणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com