Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याचा बदला घ्यावा, सांगेसह भाजप मंडळातर्फे माेर्चाद्वारे तीव्र निषेध; बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण

Sanguem BJP Protest: पहलगाम-काश्मीर येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सांगे शहरात सांगे भाजप मंडळाने मेणबत्ती मोर्चा काढला.
Sanguem BJP Protest, Pahalgam Attack
Sanguem BJP Protest, Pahalgam AttackDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: पहलगाम-काश्मीर येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सांगे शहरात सांगे भाजप मंडळाने मेणबत्ती मोर्चा काढला. दहशतवादी आणि खासकरून पाकिस्तानच्या नावाने यावेळी हल्लाबोल करण्यात आला.

या मोर्चात समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, सांगेच्या नगराध्यक्ष संतीक्षा गडकर, इतर नगरसेवक, सरपंच, पंच व नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी पहालगाममध्ये झालेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे. देशभरातून काश्मीर पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची धर्म विचारून गोळ्या घालून हत्या केल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून भारत सरकारने या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Sanguem BJP Protest, Pahalgam Attack
Pahalgam Attack: 'मला रात्री झोप येईना', गोव्यातील प्रसिद्ध टीटोजच्या मालकाने गुड फ्रायडेची कमाई पहलगामच्या जखमींना केली दान

पहलगाममधील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदला घ्यावा, अशी मागणी देशभरातून होत आहे. हीच मागणी सांगेच्या नागरिकांनीही केलेली आहे. ही एक ठिणगी असून गरज पडल्यास दहा हजारपेक्षा अधिक नागरिकांचा निषेध मोर्चा काढण्यास आम्ही मागे हटणार नाही, असे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

Sanguem BJP Protest, Pahalgam Attack
Pahalgam Attack: दहशतवाद्यांच्या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच! पाटकरांचे प्रतिपादन; गोवा काँग्रेसतर्फे कँडल मार्च

यावेळी नगरसेवक संगमेश्वर नाईक, नगराध्यक्ष संतिक्षा गडकर, उपनगराध्यक्ष सय्यद इक्बाल यांनी दहशतवाद्यांना भारत सरकारने धडा शिकवावा, असे आवाहन केले. यावेळी  सरपंच राजेश गावकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी निष्पाप बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com