Science Exhibition : सांकवाळ येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात

Science Exhibition : यानिमित्त मुरगाव तालुक्यातील नववी, दहावी आणि अकरावी व बारावी (विज्ञान) अशा दोन गटात प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली.
Sancoale
SancoaleDainik Gomantak
Published on
Updated on

Science Exhibition : वास्को, पारुल विद्यापीठ आणि शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, सांकवाळच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी-नृसिंह सभागृह, सांकवाळ येथे ''बंडिंग मॉडर्न साइंटिस्ट २०२३'' हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले.

यानिमित्त मुरगाव तालुक्यातील नववी, दहावी आणि अकरावी व बारावी (विज्ञान) अशा दोन गटात प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली. २५ हून अधिक विद्यालयांनी यात भाग घेतला. सुमारे ४०० विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Sancoale
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात इंधनाच्या किमती घटल्या; जाणून घ्या 24 डिसेंबरचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

या प्रदर्शनाचे उद्‍घाटन गोव्याचे अनिवासी भारतीयांचे आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, मुरगावचे नगरसेवक दीपक नाईक, पारुल विद्यापीठाचे पीआरओ डॉ. अजय यादव, शांतादुर्गा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महादेव नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अॅड. नरेंद्र सावईकर म्हणाले, सध्याचे युग हे ज्ञानाभिमुख असून विज्ञानाच्या आधारे प्रगती करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com