Sancoale News: सांकवाळ अपघातप्रवण क्षेत्र वाहतुकीस धोकादायक; खंडपीठाच्या सूचना

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
Court
CourtDainik Gomantak

सांकवाळ गावातील वाढणाऱ्या अपघातासंदर्भातच्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रस्ता सुरक्षिततेचा प्रश्‍न जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी हाताळण्याच्या सूचना केली.

तसेच या अपघाताला आमंत्रण ठरणाऱ्या सांकवाळ या अपघाप्रवण क्षेत्राच्या रस्त्यावरील भटक्या गुरांसंदर्भात काय कार्यवाही केली त्याचा प्रत्येक तिमाहीनंतर सांकवाळ पंचायतीकडून अहवाल पंचायत संचालकांनी घेण्याचे निर्देश देत जनहित याचिका निकालात काढली.

अथनैन अवधूत नाईक व इतरांनी अपघातात वाढ होत असल्याबद्दल जनहित याचिका दाखल केली होती. हा रस्ता अपघाताचा विषय जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक योग्य तऱ्हेने हाताळू शकतील.

त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी ही जनहित याचिका पत्र म्हणून त्याची दखल घेत याचिकादाराने केलेल्या विनंतीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावेत, असे खंडपीठाने म्हटले आहे.

Court
Ravindra Bhawan: मडगाव, मुरगाव, कुडचडे रवींद्र भवन बिनकामाचे!

गुरांची समस्या पंचायतीनेच सोडवावी

सांकवाळ येथील रस्ता अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे गतिरोधक उभारण्याचे अधिकार सांकवाळ पंचायतीला नाहीत. त्यामुळे याचिकेत पंचायतीला प्रतिवादी करून निर्देश देण्याची केलेली विनंती योग्य नाही अशी बाजू पंचायतीच्या वकिलांनी मांडली.

तेव्हा खंडपीठाने त्यात हस्तक्षेप करत या अपघाताच्या समस्येबाबत पंचायतीने स्वतःहून दखल घेऊन त्यावर वाहतूक सुरक्षेबाबत उपाय काढण्याची आवश्‍यकता होती. रस्त्यावर बसणाऱ्या गुरांची समस्या सोडवण्याचे पंचायतीचे कर्तव्य आहे, असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com