Sanauelim News : साखळीत वीरभद्राचा थरार; तलवारी नाचवत ‘भूपराज’चा गजर

Sanauelim News : हा थरार अनुभवण्यासाठी विठ्ठलापुरात हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. वाळवंटी किनारी पुंडलीक मंदिरात वीरभद्राला रंगवून सजविल्यानंतर तो विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ आला. नंतर श्री मारुती मंदिरात दर्शन घेतल्यावर त्याच्या पाठीला ‘भद्र’ म्हणजेच प्रभावळ बांधण्यात आली.
Sanauelim
Sanauelim Dainik Gomantak

Sanauelim News :

साखळी, ‘भूपराज’चा गजर करताना हातातील धारदार तलवारी नाचवत खास नृत्य करून उपस्थितांमध्ये थरार निर्माण करणारा विठ्ठलापूर-साखळीतील प्रसिद्ध आणि तितकाच वैशिष्ट्यपूर्ण असा वीरभद्र सोहळा बुधवारी पहाटे उत्साहात साजरा करण्यात आला.

हा थरार अनुभवण्यासाठी विठ्ठलापुरात हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. वाळवंटी किनारी पुंडलीक मंदिरात वीरभद्राला रंगवून सजविल्यानंतर तो विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ आला. नंतर श्री मारुती मंदिरात दर्शन घेतल्यावर त्याच्या पाठीला ‘भद्र’ म्हणजेच प्रभावळ बांधण्यात आली.

Sanauelim
Vote to save Goa : गोवा वाचविण्‍यासाठीच मतदान करा; ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या निवडणूक महाचर्चेत वक्‍त्‍यांचा सूर

ती बांधताच तो मोठ्या बाकावर चढला. तेथे त्याची पूजा व ओवाळणी करण्यात आली. हातात तलवारी देण्यात आल्या. तलवारी हातात देताच ‘भूपराज’ असा गजर करण्यात आला. त्यानंतर खऱ्या खेळाला सुरवात झाली. दैवी अवसारानंतर अधिकच आक्रमक होणाऱ्या वीरभद्रावर नियंत्रण आणताना साथीदारांची दमछाक होते.

मिरवणुकीने उत्सवाची सांगता

अवसर आलेल्या वीरभद्राला उचलून विठ्ठल-रखुमाई मंदिरात नेण्यात आले. तेथे देवाचे तीर्थ अंगावर शिंपडल्यावर आणि ते प्राशन केल्यावर त्याचा अवसर निवळला. तोपर्यंत त्याच्या अंगावरील वीरभद्राचे कपडे आणि अलंकार उतरविण्यात आले. या सोहळ्यानंतर मंदिराच्या प्रांगणात श्रींची खास रथातून मिरवणूक काढण्यात आली. नंतर या उत्सवाची सांगता झाली.

वीरभद्रावर नियंत्रणासाठी पराकाष्ठा

टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर ताल धरणारा वीरभद्र वाद्यांच्या आवेगाप्रमाणे अधीर, उत्साहीत होऊन नाचतो. बेधुंदपणे नाचतानाच त्याच्यावर दैवी अवसर येतो अन् तो अधिकच आक्रमक होतो. यावेळी त्याच्यावर ताबा मिळविण्यासाठी सतर्क लोक त्याला उंच उचलतात. हातातील तलवारी घट्ट पकडल्या जातात. हात-पाय घट्ट धरले जातात.

टाळ- मृदंगाच्या तालावर नृत्य

टाळ- मृदंगाचा गजर सुरू होताच वीरभद्र तलवारी नाचवू लागला. त्याचवेळी तेथील गवताच्या रिंगणाला आग लावण्यात आली. या रिंगणाला तीन फेऱ्या मारल्यानंतर वीरभद्र थेट मुख्य मंडपात दाखल झाला. फेऱ्यांना सुरवात झाली.

तलवारी नाचवत वीरभद्र टाळ- मृदंगाच्या ठेक्यावर नाचू लागला. काही फेऱ्या झाल्यानंतर त्याच्यावर दैवी अवसर आला आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्याची धडपड सुरू झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com