कविता नक्षत्रासारखी असते; तिच्या स्पर्शाने आयुष्य उजळते

अरुण म्हात्रे : विविध कवींच्या कविता सादरीकरणाने ‘आयएमबी’त रंगला सम्राट काव्यमहोत्सव
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

साहित्यात अनेक प्रकार आहेत; पण कविता नक्षत्रासारखी चमकत असते. कवितेचा स्पर्श झाला की, आयुष्य उजळून निघ, असे प्रतिपादन नामवंत कवी तथा गीतकार अरुण म्हात्रे यांनी येथे केले.

Goa News
Illegal Hoardings In Mapusa: म्हापसा पालिका क्षेत्रात आहेत 65 बेकायदा होर्डिंग्स

सम्राट क्लब केरी व सम्राट क्लब इंटरनॅशनलने भाषा संचालनालय, गोवा शासनाच्या सौजन्याने आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या सहयोगाने आयएमबी सभागृहात शनिवारी आयोजित सम्राट काव्यमहोत्सवाचे उद्‌घाटन केल्यानंतर अरुण म्हात्रे बोलत होते. यावेळी सम्राट इंटरनॅशनलचे राज्य अध्यक्ष शैलेश बोरकर, उपाध्यक्ष शशिकांत पुनाजी, सम्राट केरीचे अध्यक्ष ॲड. मोहन गावकर, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, काव्यमहोत्सवाचे अध्यक्ष दीपक नार्वेकर, समन्वयक कालिका बापट ही मंडळी उपस्थित होती.

म्हात्रे यांच्या हस्ते ‘आरजे’ तथा अभिनेता आर्यन खेडेकर, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कवयित्री अनुराधा म्हाळशेकर, ज्येष्ठ कवी दशरथ परब, साहित्यिक तथा चित्रपट निर्मात्या ज्योती कुंकळकर, व्हिडिओ गीत निर्मात्या कवयित्री कालिका बापट, कवी शशिकांत पुनाजी, सम्राटचे भूतपूर्व राज्य अध्यक्ष दीपक नार्वेकर यांचा सन्मान केला.

Goa News
Goa Shack Business: शॅक व्‍यवसायासाठी वयोमर्यादेची अट जाचक

निमंत्रितांचे कविसंमेलन

शेवटच्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले. त्यात डॉ. नूतन देव, मीना समुद्र, माया खरंगटे, दुर्गाकुमार नावती, उर्जिता भोबे, डॉ. नीता तोरणे, जॉन आगियार, डॉ. सुनेत्रा कळंगुटकर, डॉ. सोनिया सिरसाट, अंजली चितळे, श्रद्धा गवंडी, वृषाली केळकर, माधुरी शेटकर, पूर्णिमा देसाई, महेश पारकर, प्रियांका परब, अंजली नाईक, रमेश घाडी, परेश नाईक, नूतन साखरदांडे, डॉ. अनिता तिळवे, नयना आडारकर, राजश्री सैल, दयाराम पाडलोस्कर आदींचा सहभाग होता.

विद्यार्थ्यांचे सादरीकरण

सकाळच्या सत्रात ‘काव्य दर्पण’मध्ये केपे महाविद्यालय, धेंपे महाविद्यालय, साखळी महाविद्यालय, कार्मेल कॉलेज, पेडणेचे संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय यामधील विद्यार्थ्यांनी कविता सादर करून दाद मिळवली.

मी मराठी भाषिक आहे म्हणून आयुष्य सुंदर झाले आहे, असे वाटते; परंतु एक भाषा दुसऱ्या भाषेचा द्वेष करू शकत नाही; कारण भाषा या भगिनी आहेत. गोव्यात मराठी-कोकणी असा वाद होऊ शकत नाही. कारण, एकाच मातेची ही दोन लेकरे आहेत. गोवा म्हणजे आनंदाचा सोहळा, त्यामुळे इथे भाषावाद होता नये.

- अरुण म्हात्रे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com