Sambhaji Bhide Goa Visit: शिवपुतळ्याच्या विटंबनेनंतर संभाजी भिडे 'या' दिवशी येणार गोव्यात; दवर्लीत व्याख्यान

काय बोलणार याकडे लक्ष
Sambhaji Bhide
Sambhaji BhideDainik Gomantak
Published on
Updated on

Sambhaji Bhide Goa Visit: वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे आता गोव्यात येणार आहेत. येत्या २४ ऑगस्ट रोजी त्यांचे दवर्लीतील समर्थ गडावर व्याख्यान होणार आहे.

दवर्ली मडगाव येथील श्री स्वामी समर्थ गडावर त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यान होणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचे प्रकार घडले होते, तसेच महाराजांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली होती. त्या पार्श्वभुमीवर आता संभाजी भिडे गोव्यात काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sambhaji Bhide
GMC News: 'गोमॅको'च्या स्वच्छतेसाठी दररोज खर्च होतात 2.3 लाख रुपये...

गोव्यात काही दिवसांपुर्वी करासवाडा - म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. तर त्या आधी चिखलीतील चर्चचे फादर बोलमॅक्स परेरा यांनी शिवरायांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

तसेच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार क्रुझ सिल्वा यांनी शिवजयंतीवरील खर्चाचा मुद्दा उपस्थित केला होता. या सर्व प्रकारांवरून शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिली होती.

त्यापुर्वी कळंगुटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरूनही वाद झाला होता. तेव्हा कळंगुट पंचायतीबाहेर शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत सरपंच जोसफे सिक्वेरा यांना माफी मागण्यास भाग पाडले होते.

Sambhaji Bhide
Bicholim School: महत्वाची बातमी! ‘स्प्रे’प्रकरणी पाच विद्यार्थी निलंबित, शिस्तपालन समितीची कारवाई

या सर्व वादांच्या पार्श्वभुमीवर संभाजी भिडे गोव्यात येत असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. संभाजी भिडे यांनी यापुर्वी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या बागेतील आंब्याच्या झाडाचा आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते, असा दावा त्यांनी केला होता.

तसेच एका महिला पत्रकाराला आधी टिकली लाव, मगच बोलेन, असेही ते म्हणाले होते. अलीकडच्या काळात त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज या प्रतिकांबाबतही त्यांनी नकारात्मक टिपण्णी केली होती, या सर्व कारणांनी भिडे हे गेल्या काही काळात चर्चेत आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com