Hill Cutting: ग्रामस्थ व विरोधी पंचांचा आक्रमकपणा पाहून सरपंच नाईक व सत्ताधारी पंचायत मंडळाने ग्रामसभा अर्ध्यावरच सोडून पळ काढला
Salvador Do Mundo GramsabhaDainik Gomantak

Salvador Do Mundo: डोंगरकापणीच्या प्रश्नावर निरुत्तर 'साल्वादोर'च्या महिला सरपंच गेल्या विरोधकांच्या अंगावर धावून Video

Salvador Do Mundo Gramsabha: ग्रामस्थ व विरोधी पंचांचा आक्रमकपणा पाहून सरपंच नाईक व सत्ताधारी पंचायत मंडळाने ग्रामसभा अर्ध्यावरच सोडून पळ काढला
Published on

Salvador Do Mund Gramsabha

पर्वरी: पैठण येथील बेकायदा डोंगरकापणीच्या मुद्यावरून आज साल्वादोर द मुन्‍द पंचायतीची ग्रामसभा वादळी ठरली. प्रश्‍‍नांना उत्तरे देण्यास असमर्थ ठरलेल्या सरपंच बिंदिया नाईक या विरोधी पंचसदस्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला.

ग्रामस्थांनीही प्रश्‍‍नांची सरबत्ती करून जेरीस आणल्यानंतर निरुत्तर झालेल्या सरपंचांनी अखेर सत्ताधारी पंचायत मंडळासह ग्रामसभेतून काढता पाय घेतला.

ग्रामसभेस सुरूवात होताच विरोधी पंच संदीप साळगावकर, विजय दळवी, रिना फर्नांडिस व दत्ताराम रेडकर यांच्यासह ग्रामस्थांनीही सत्ताधारी पंचायत मंडळावर प्रश्‍‍नांचा भडिमार केला. डोंगरकापणीवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली असता सरपंच बिंदिया नाईक निरुत्तर झाल्या.

त्यातच विरोधी पंचांनी या प्रकरणात गोलमाल असल्याचा आरोप केल्यानंतर सरपंच सैरभैर झाल्या. विरोधी पंच संदीप साळगावकर व समाजसेवक सुरेंद्र तारी यांच्या अंगावर धावून जात त्यांनी त्यांच्या हातातील मोबाईलही खाली पाडण्याचा प्रयत्न केला.

ग्रामसभा अर्ध्यावरच सोडून पळ

सुमारे ३०० ग्रामस्थ पंचायत सभागृहात ग्रामसभेसाठी उपस्थित होते. ग्रामस्थ व विरोधी पंचांचा आक्रमकपणा पाहून सरपंच नाईक व सत्ताधारी पंचायत मंडळाने ग्रामसभा अर्ध्यावरच सोडून पळ काढला. हा अजब प्रकार पाहून सर्वचजण अवाक झाले. या एकंदर प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.

गावात चांगला प्रकल्‍प आल्‍यास कोणीही विरोध करणार नाही. पैठण येथील डोंगरकापणी बेकायदा आहे. अशा अवैध कामासाठी पंचायत बांधकाम परवाना कसा काय देऊ शकते? -

संदीप साळगावकर, विरोधी पंच

ग्रामसभेतून पंचायत मंडळाने पळ काढल्याने आमचे अनेक प्रश्‍‍न अनुत्तरित राहिले. सरपंच नसल्यास उपसरपंचांनी ग्रामसभा घ्यायला हवी. पण या पंचायतीत उपसरपंचच निवडलेला नाही.

दिनेश नाईक, ग्रामस्थ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com