Salcete : कुत्र्यांच्या निवारागृहाची समस्या सोडवा : शॅडो कौन्सिलची मागणी

23 जून रोजी नगरपालिका कौन्सिलची बैठक होणार आहे व या विषयावर चर्चा होण्याची शक्यता कुतिन्हो यांनी व्यक्त केली आहे.
Shadow Council
Shadow CouncilGomantak Digital Team
Published on
Updated on

Salcete : कुत्र्यांचे निवारागृह तसेच प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमाबद्दल ज्या समस्या आहेत त्या 15 दिवसांत सोडवा नाही तर मडगावचे नागरिक कुत्र्यांच्या नवजात पिल्लांना नगरपालिकेच्या आवारात आणून सोडतील, असा इशारा शॅडो कौन्सिल व संबंधित नागरिकांनी मडगाव नगरपालिकेला दिला आहे. नगरपालिका भटक्या जनावरांचा प्रश्र्न हाताळण्यात अपयशी ठरत आहे.

जानेवारी 2021 पासून नगरपालिकेने ज्या निमसरकारी संस्था भटक्या जनावरांचा प्रश्र्न हाताळत आहे, त्यांना अजून त्यांचे अनुदान दिलेले नाही, असा आरोप शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला. आता 23 जून रोजी नगरपालिका कौन्सिलची बैठक होणार आहे व या विषयावर चर्चा होण्याची शक्यता कुतिन्हो यांनी व्यक्त केली आहे.

Shadow Council
Salcete Agriculture : गोव्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ई-नाम’ ट्रेडिंग पोर्टल सुरू

शुक्रवारी (ता.१६) सोनसोडोजवळील कुत्र्यांच्या निवारा गृहाकडे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी आर्किटेक्ट कार्लोस ग्रासियस, दामोदर ओंसकर, मेल्विन फर्नांडिस, ॲंथनी गोन्साल्विस, क्लेरिसा डिसोझा, सोनिया फर्नांडिस, ज्योत्स्ना देसाई, आरती पै आंगले, अलिशा लॉरेन्स, नेविल मार्शोन, बॉस्को डिकॉस्ता व इतर उपस्थित होते.

Shadow Council
Salcete News : कुंकळ्ळीचे बंड अभ्यासक्रमात; ‘चिफ्टन्स मेमोरियल’ला आनंद

गोव्यात कुत्र्याने चावा घेतलेल्या जवळजवळ 22 हजार घटना नोंद आहेत व त्यातील मडगावात जास्तीत जास्त प्रकरणे आहेत. लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतलेल्या घटना गंभीर स्वरूपाच्या आहेत. आपण नगराध्यक्ष असताना 2010 साली भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड बांधण्यात आली होती. सोनसोडो येथील पशुसंवर्धन खात्याच्या जागेत मोठी जागा देण्यात येईल, असे आश्र्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अजूनही या आश्र्वासनाची पूर्तता झालेली नाही.

- सावियो कुतिन्हो, निमंत्रक, शॅडो कौन्सिल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com