Goa Agriculture: सासष्टीची कृषी क्षेत्रात ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल !

स्थानिक फळे,भाज्यांना मागणी- पडीक शेतजमीन लागवडीखाली, तरूणांची पावले वळताहेत शेतीकडे
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak

Goa Agriculture: कोविड महामारीनंतर कृषी क्षेत्रात भरीव काम झाले. अनेकांनी शेती, बागायतीची कामे सुरू केली. विविध पिके घेण्यात सुरूवात केली. त्यामुळे कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची इच्छाशक्ती वाढली आहे. शेतीतून चांगले उत्पन्न अनेकजण घेत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर विविध प्रकारची भाजी, फळेही उपलब्ध होत आहेत.

राज्यात अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पडीक शेत जमिनीत लागवड केली. त्यात सासष्टी तालुका सर्वांत पुढे प्रगतीपथावर आहे. बेताळभाटी येथील कोन्स्तान्सियो डिसिल्वा, सुरावली येथील तानिया रिबेलो तसेच बेताळभाटी शेतकरी क्लबने कृषी क्षेत्रामध्ये भरीव अशी प्रगती केली आहे.

कृषी खात्याने पंपसेट, ठिबक सिंचन (ड्रीप) व इतर सामग्री शेतकऱ्यांना सवलतीत पुरविली. कृषी खात्याच्या योजनांचा फायदा घेऊन टिना रिबेलो यांनी सासष्टी व सांगेतही सूर्य फुलांची लागवड केली. त्यांनी निर्यातही केली आहे.

Goa Agriculture
Goa Agriculture: आरोग्यमंत्र्यांचा 'शेती' सल्ला, म्हणाले बागायती टिकवण्यासाठी युवकांनी...

गोव्यातही सूर्यफूलाचे पीक घेता येऊ शकते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. बेताळभाटी शेतकरी क्लबचे अध्यक्ष ज्यो कोता. सचिव माल्कम आफोंस, कार्यकारी सदस्य जुझे परेरा हे स्वतः शेतीत रस घेऊन इतरांनाही मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षांत खरीप, रब्बी व उन्हाळी पिके घेतली आहेत, हळदीने त्यांना खूप लाभ झाला आहे.

आपल्या शेतीबरोबरच काही लोकांनी पोरसू संस्कृतीचा अवलंब केल्याचे आढळून आले आहे. या पोरसात पिकवलेल्या भाज्या, फळे, केळी त्यांना पुरेशा आहेत व उर्वरीत भाज्या, फळे बाजारात आणूनही काही लोक विकू लागले आहेत.

सासष्टीत जवळ जवळ दोन हजार हेक्टर जमीन नव्याने लागवडीखाली आल्याची नोंद विभागीय कृषी खात्याने घेतली आहे. त्यातही युवापिढी उत्साह दाखवत आहे.

Goa Agriculture
Goa Beach: किनारी भागातल्या अवैध धंद्यांबाबत पर्यटन मंत्री संतापले, म्हणाले...

5 हजार चौ.मी.जागेत 12 टन कलिंगड !

कोन्स्तान्सियो डिसिल्वा यांनी शेतात मिरच्या, वांगी, कलिंगड यांची लागवड करून वर्षाकाठी अनेकांना रोजगारही मिळवून दिला असून आर्थिक उत्पन्नही मिळाले. कृषी खात्याच्या विभागीय कार्यालयानेही त्याची नोंद घेतली आहे.

विभागीय कृषी अधिकारी फुर्तादो म्हणाले, की यंदा कालिंगडांचे मुबलक पीक आले ही उत्साहवर्धक बाब आहे. यंदा डिसिल्वा यांनी 5 हजार चौ.मी. जागेत 12 टन कलिंगडांचे पीक घेतले आहे.

39 शेतकऱ्यांना 40 लाखांचे अनुदान !

युवा शेतकऱ्यांना आम्ही शेती लागवडीसाठी प्रोत्साहित करतो, असे कृषी अधिकारी फुर्तादो यांनी सांगितले. 2021-22 या काळात कृषी खात्यातर्फे सासष्टीतील 39 शेतकऱ्यांना 40 लाखांचे अनुदान दिले. 101 जणांना शेतकरी आधार निधी अंतर्गत 11 लाखांचे वितरण केले. 188 शेतकऱ्यांना नारळासाठी 30 लाखांची आधारभूत किंमत मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com