डिचोली : कृतिशील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी डिचोलीतील सरकारी प्राथमिक विद्यालय साळ पुनर्वसन विद्यालयाची इमारत धोकादायक स्थितीत आहे. याची त्वरीत दुरुस्ती न केल्यास विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता पालक वर्गाने व्यक्त केली आहे.
दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीतर्फे इमारतीच्या दुरुस्तीसाठीचे प्रयत्न सातत्याने पाठपुरावा केला पण सरकारने मात्र या विद्यालयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.
25 वर्षांपूर्वी या 7 खोल्याच्या शाळेची इमारत साळ पुनर्वसन येथे उभारली होती. पण प्रत्यक्षात ती 2008 पासून सुरु झाली. सुरुवातीची काही वर्षे या विद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्या कमीच होती. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून शिक्षकांच्या उपक्रमशील शिक्षण पद्धती राबिवल्याने ही संख्या आता 70 वर आली आहेत. दुसरीकडे या इमारतीचे बांधकाम कमकुवत असल्याने स्लॅबचा आतील भागाचे तुकडे पडत आहे तसेच पावसाळ्यात तर स्लॅब मधून पाणी झिरपत असल्याचं चित्र आहे.
पावसाळ्यात इमारतीच्या भिंती ओल्याचिंब होत असतात आणि त्यातून पाणी झिरपत असते. वर्गात पाणी पडत असल्याने मुलांची पुस्तके, शाळेतील दस्तावेज भिजतात. तसेच छपराचे लहान मोठे तुकडे पडत असतात त्यामुळे मुलांना जीव मुठीत घेऊन शिकावे लागते आहे. तसेच येथे स्थानिक अंगणवाडीचे वर्गही भरतात. शाळा आणि अंगणवाडी मिळून 100 च्या आसपास विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची सरकारच्या दुर्लक्षामुळे गैरसोय होत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.