साळ, आरोग्य सेवा संचालनालय आणि सामुदायिक आरोग्य केंद्र डिचोलीच्या मार्गदर्शनाखाली उपआरोग्य केंद्र, खोलपेवाडी मार्फत मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया संदर्भात जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण खोलपे गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यात विविध महिला मंडळ व क्रीडा क्लबचे सदस्य तसेच ग्रामस्थांनी भाग घेतला. श्री केळेश्वर मंदिर परिसर, खालचावाडा, वरचावाडा, मधलावाडा, तिराळी वसाहत, गवळीवाडा या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व अन्य कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर श्री केळेश्वर मंदिराच्या सभा मंडपात आरोग्य खात्याचे अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन कार्यक्रम झाला.
ठाकूर यांनी प्रत्येकाने स्वच्छता राखली, स्वच्छता बाळगली तर आपले आरोग्य निरोगी राहील. त्यामुळे गाव सुद्धा निरोगी राहील. दिवसादेखील डास चावून डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया सारखे रोग पसरतात. असे आजार जडल्यास वेळीच उपचार करणे योग्य ठरते. त्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे सांगितले.
यावेळी आरोग्य कर्मचारी गौरी पटकारे, अंगणवाडी सेविका शशिकला राऊत, महिला मंडळ सदस्य श्वेता शिरोडकर, रश्मी सावंत, साधना ठाकूर, चित्रा रेडकर, विजया सावळ, अर्चना वारंग तसेच क्लबचे सदस्य बाबाजी शिरसाट, महादेव सातारडेकर, ओम ठाकूर, मधू ठाकूर, लवू गवस, यश राऊत, विराट पाडलोस्कर, अनंत बांदेकर, रोहिणी सावंत, पुनम साळगावकर, अच्युत परब, भिकाजी शिरोडकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ठाकूर यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.