Sal News : साळ पुनर्वसन विद्यालयात ‘सृजनानंद २०२४’ उत्साहात; विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

Sal News : ‘उत्सव -हिंदू संस्कृतीचा’ महानाट्य सादर
Sal
SalDainik Gomantak
Published on
Updated on

Sal News : पर्ये, उक्रमशील विद्यालय म्हणून नावारूपास आलेले सरकारी प्राथमिक विद्यालय साळ पुनर्वसन डिचोली येथे ‘सृजनानंद २०२४’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयाचे विद्यार्थी, अंगणवाडी मुले आणि माजी विद्यार्थी मिळून १०० कलाकारांनी अभिनय, नृत्य, संगीत, संवाद आदी कलागुणांचा आविष्कार दाखवत ‘उत्सव - हिंदू संस्कृतीचा’ हे महानाट्य सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली.

विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील, स्मिता राऊळ, संकेत नाईक यांच्या संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन यातून हे एक तासाचे महानाट्य सादर झाले.

श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रय देवस्थान साळ पुनर्वसन येथे झालेल्या सृजनानंद कार्यक्रमात विद्यार्थी गौरव सोहळा झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ज्ञ सुहास ठाकूरदेसाई, साळ ग्रामपंचायत सदस्य दिव्या देविदास नाईक, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऋतूजा कृष्णकांत गवस, अंगणवाडी शिक्षिका अलिशा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Sal
Goa Politics: गोवा मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली, आणखी एका मंत्र्याला करावा लागणार मंत्रीपदाचा त्याग

वर्षभरात आयोजित स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यंदाचा ''उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार'' कु. पालवी संकेत नाईक हिला प्रदान करण्यात आला.

सूत्रसंचालन पालक अर्जुन गवस आणि कविता गवस यांनी केले. ऋतूजा गवस यांनी आभार मानले.

अध्ययन प्रक्रियेसाठी चिंता,भयमुक्त वातावरण असावे. घरातील वातावरणाशी, आपल्या वस्ती-वाडीवरील वातावरणाशी मूल स्वाभाविकरित्या परिचित असते.

वयानुरूप ठराविक परिघातील वातावरणाशी मूल परिचित होते. त्यामुळे त्याला सुरक्षित वाटते अशा सुरक्षित वातावरणात त्याचे अध्ययन उत्तम होत असल्याने पालकांनी पाल्यांना दूरच्या केजीत घालून मुलांच्या मनात असलेली भावनिक व मानसिक सुरक्षितता प्रतिष्ठेपोटी धोक्यात आणू नये.

-सुहास ठाकुरदेसाई ,शिक्षणतज्ज्ञ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com