Bashudev Bhandari: ..त्याला पोहता येत न्हवते! बेपत्ता 'बाशुदेव'बाबत पोलिसांचा निष्कर्ष; मद्यप्राशन, वजनामुळे संशयास वाव

St Estevam River Accident: टोलटो-सांतइस्तेव येथील फेरीबोट धक्क्यावरून कार पाण्यात गेल्याने बेपत्ता झालेला बाशुदेव भंडारी याने व्हिस्कीत बियर मिळवून त्याचे प्राशन केले होते.
St Estevam River Accident
Bashudev Bhandari CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: टोलटो-सांतइस्तेव येथील फेरीबोट धक्क्यावरून कार पाण्यात गेल्याने बेपत्ता झालेला बाशुदेव भंडारी याने व्हिस्कीत बियर मिळवून त्याचे प्राशन केले होते. त्याला पोहता येत नव्हते. त्याचे वजन ९६ किलो होते. त्यामुळे तो नदीत बुडाल्यानंतर बेपत्ता झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी न्यायालयात यासीन शेख व महमद मुल्ला यांच्याविरोधात आरोपपत्र सादर केले आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली होती.

या आरोपपत्रात त्यांनी बाशुदेवच्या मैत्रिणीने आपण बाशुदेवला कधी पोहताना पाहिले नाही, असे नमूद केले आहे. तिच्या म्हणण्‍यानुसार, गुजरातमधील एका व्हिलामध्ये ते गेले असता बाशुदेवने त्याला पोहता येत नसल्याचे सांगितले होते, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

St Estevam River Accident
Bashudev Bhandari: मैत्रिणीसोबत गोव्यात आला, कार गेली नदीत! 1 वर्ष झाले तरी बेपत्ता; गुजरातचा 'बाशुदेव' नेमका गेला कुठे?

पोलिसांनी बाशुदेवचा मित्र कल्पराज सिंह याची जबानी घेतली असता बाशुदेवला पोहता येत नाही. कांदोळी येथील एका रिसॉर्टमध्ये तरण तलाव होता. तेथेही बाशुदेवने आपल्याला पोहता येत नसल्याचे सांगितले, असे कल्पराजने म्हटल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.

St Estevam River Accident
St Estevam Accident: पोलिसांचे पुन्हा 'सांतइस्तेव खाडीत' शोध कार्य! युवतीच्या जबाबात मात्र बराच गोंधळ

यासीन शेख व महमद मुल्ला यांच्या कारला बाशुदेवच्या कारची धडक बसल्याने त्यांनी पाठलाग केला. त्यामुळे बाशुदेवने त्यांच्यापासून वाचण्यासाठी कार फेरीधक्क्यावरून खाली घातली हा प्रसंग घडला. यामुळे याला तेच जबाबदार असल्याचे नमूद करून त्यांच्याविरोधात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com