Sahitya Akademi Award : शेट्ये, साळगावकर यांचा बहुमान; साहित्‍य अकादमी पुरस्‍कार

Sahitya Akademi Award : कोकणी विभागात मारली बाजी
Advait Salgaonkar Harsha Shetye
Advait Salgaonkar Harsha Shetye Dainik Gomantak

Sahitya Akademi Award :

मडगाव, भारतीय साहित्‍य अकादमीचे बाल साहित्‍य आणि युवा साहित्यिक पुरस्‍कार जाहीर झाले आहेत. कोकणी विभागात बालसाहित्‍याचा पुरस्‍कार प्रसिद्ध साहित्यिका हर्षा शेट्ये यांच्‍या ‘एक आशिल्लें बायूल’ या बाल कादंबरीला, तर युवा साहित्‍य पुरस्‍कार अद्वैत साळगावकर यांच्‍या ‘पेडण्‍याचा सामारां’ या पुस्‍तकाला प्राप्‍त झाला आहे.

५० हजार रुपये रोख आणि प्रशस्‍तीपत्र अशा स्‍वरूपाचा हा पुरस्‍कार असून हा बहुमान मिळाल्‍याबद्दल दोन्‍ही साहित्यिकांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे. हर्षा शेट्ये म्हणाल्या की, ‘एक आशिल्लें बायूल’ हे माझ्या कादंबरीतील पात्र मी स्‍वत: आहे.

त्‍यामुळे या पुस्‍तकाला मिळालेला पुरस्‍कार आनंद द्विगुणित करणारा आहे. युवा साहित्यिक साळगावकर म्हणाले की, पेडणेतील बाेली आणि संस्‍कृती यांना या पुरस्‍काराचे श्रेय जाते. त्‍यामुळे हा पुरस्‍कार केवळ माझा नसून संपूर्ण पेडणेकरांचा आहे.

आतापर्यंत कविता, बालसाहित्‍य, ललित निबंध, प्रवासवर्णन, कथा असे अनेक साहित्यिक प्रकार हाताळणाऱ्या हर्षा शेट्ये या मडगाव येथील साहित्यिका असून यंदाचे त्‍यांचे ‘एक आशिल्लें बायूल’ हे पुरस्‍कार विजेते पुस्‍तक बिम्‍ब प्रकाशनने प्रकाशित केले आहे. लहान मुलांचे जग या कृतीतून लेखिकेने प्रदर्शित केले आहे. ५० वर्षांच्‍या आधीचा गोवा त्‍यात प्रतिबिंबित झाला आहे.

शेट्ये यांची आतापर्यंत वेगवेगळ्‍या साहित्‍य प्रकारांतील सात पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत, तर बाल साहित्‍याची स्‍वतंत्र ९ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. त्‍यांच्‍या कथारंग या पुस्‍तकाला कोकणी भाषा प्रचार सभा कोची, या पुस्‍तकाला सरस्‍वतीबाई साहित्‍य पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे.

प्रवास वर्णनासाठी बिम्‍ब साहित्‍य पुरस्‍कार, आनंदयात्रा पुस्‍तकासाठी कोकणी भाषा मंडळ पुरस्‍कार तर ‘म्‍हजी माती म्‍हजे मळब’ या पुस्‍तकाला अखिल भारतीय कवयित्री संमेलनाचा गोदावरीदेवी केजरीवाल पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे.

तर, अद्वैत यांचे ‘पेडण्‍याचा सामारां’ हे प्रकाशित झालेले पहिलेच पुस्‍तक आहे. पेडणे कोकणी शैलीतील हा निबंध संग्रह आहे. त्‍यात पेडण्‍यातील कोकणी बोली शैलीसह पेडण्‍यातील वेगवेगळी सांस्‍कृतिक मूल्‍ये दिसून येतात.

गोमंतकीय संस्कृतीचे प्रतिबिंब

हर्षा शेट्ये म्‍हणाल्‍या की, पुस्‍तकाला पुरस्‍कार मिळाल्‍याने झालेला आनंद वेगळाच आहे. कारण या पुस्‍तकातील जी ‘बायूल’ आहे, ती बालपणातील मी असून त्‍यावेळचे माझे निसर्गासोबत जुळलेले नाते त्‍यातून प्रतिबिंबित झाले आहे. मी वयाच्‍या सातव्‍या वर्षापर्यंत आजोळी वाढले. जीवाला जीव देणारी माणसे आणि त्‍यातून तयार झालेली समृद्ध अशी गोव्‍याची संस्‍कृती या पुस्‍तकात दिसून येते.

युरींकडून अभिनंदन :

अमेरिकेत झालेल्या ‘वर्ल्ड बेंच प्रेस चॅम्पियनशीप’मध्ये पाचवे स्थान पटकावल्याबद्दल पिएदाद कार्व्हालो यांचे, तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या हर्षा शेट्ये आणि अद्वैत साळगावकर यांचे विराेधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अभिनंदन केले आहे. पिएदाद कार्व्हालो यांच्या भावी कामगिरीसाठी त्‍यांनी शुभेच्छा दिल्‍या आहेत.

Advait Salgaonkar Harsha Shetye
Goa News : ‘साल्ढाणा’तील शौचालयाची ३१ जुलैपर्यंत दुरुस्ती : मंत्री आलेक्स सिक्वेरा

पेडणे संस्कृतीला श्रेय

युवा महोत्‍सव चळवळीतून पुढे आलेले अद्वैत यांनी कोकणीच्‍या वेगवेगळ्‍या कार्यात योगदान दिले आहे. त्‍यांचे हे पुस्‍तक संजना प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्‍तकाला पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल आनंद होत आहेच; पण हा पुरस्‍कार माझ्‍या पेडण्‍यातील बोलीला आणि संस्‍कृतीला मी अर्पित करतो. हा सर्व पेडणेकरांना मिळालेला पुरस्‍कार आहे, अशी प्रतिक्रिया साळगावकर यांनी व्‍यक्‍त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com