Goa BJP : भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता नाही : तानावडे

सामाजिक न्याय आठवड्यानिमित्त नागरिकांचा सत्कार
goa Bjp
goa BjpDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात मंत्रिमंडळ बदलाची केवळ चर्चा सुरू असून याबाबत कोणत्याही स्वरूपाचा ठोस निर्णय झालेला नाही वा मंत्रिमंडळात आणि आमदारांमध्ये कसलीच अस्वस्थता नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज स्पष्ट केले.

goa Bjp
CM Pramod Sawant : पैसे उकळणाऱ्यांची गय करणार नाही

तानावडे म्हणाले, भाजपचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष हुबळी दौऱ्यावर जात असताना गोव्यात थांबले होते. यामुळे राजकीय चर्चांना जोर आला असला, तरी सध्या तरी मंत्रिमंडळात फेरबदल अथवा अस्वस्थता नाही.

राज्यात सुरू असलेल्या सामाजिक न्याय आठवड्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार प्रवीण आर्लेकर उपस्थित होते. अनुसूचित जाती (एससी) समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com