Sadanand Shet Tanavade with CM Pramod Sawant
Sadanand Shet Tanavade with CM Pramod SawantDainik Gomantak

गोवा आर्थिक विकास महामंडळाकडून राज्य सरकारला 84 कोटींचा लाभांश

महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला धनादेश
Published on

पणजी : राज्याच्या साधन सुविधांमध्ये संख्यात्मक व गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या गोवा आर्थिक विकास महामंडळाला सरकारकडून मिळालेल्या भागभांडवलाचे व्याज म्हणून 12.80 कोटी रुपये आज सरकारला देण्यात आले. 84 कोटी रुपये लाभांश लवकरच दिले जातील अशी माहिती तानवडे यांनी दिली आहे.

Sadanand Shet Tanavade with CM Pramod Sawant
पिसुर्लेतील खनिज वाहतूक बंद ठेवण्याचे कोर्टाचे आदेश

महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे हा व्याजाच्या रक्कमेचा धनादेश दिला. यावर्षी महामंडळाला 52 कोटी रुपये नफा झाला असून मागील वर्षी तो 73 कोटी होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले, की गोवा आर्थिक विकास महामंडळाचा कारभार इतरांसाठी आदर्श असून इतर महामंडळानेही याच्या पद्धतीने आपला कारभार करणे गरजेचे आहे.

Sadanand Shet Tanavade with CM Pramod Sawant
कथित खंडणी प्रकरणी धर्मेश सगलानी पोलिसांच्‍या ताब्‍यात

महामंडळे स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होणे गरजेचे आहे. तरच ही महामंडळ चालतील महामंडळाकडून मुख्यमंत्री (CM) रोजगार योजना राबविण्यात येत असून या पुढच्या काळात ही अशा प्रकारचे उपक्रम चालूच राहतील. याशिवाय राज्यातील युवकांना रोजगार (Employment) संधी उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ कार्यरत असेल, असंही पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com