
पणजी: मुळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे १५० खाटांचे इस्पितळ सुरू करण्याच्या कामास गती देण्याची गरज राज्यसभेत खासदार सदानंद शेट तानावडे यांनी अधोरेखित केली. राज्यसभेत विशेष उल्लेख करताना त्यांनी ही मागणी केली.
तानावडे यांनी सभागृहाला माहिती दिली, की कर्मचारी राज्य विमा योजना सध्या गोव्यात २.५४ लाख विमाधारक व सुमारे ८.५ लाख लाभार्थ्यांना मिळते. यातील मोठ्या संख्येने लाभार्थी उत्तर गोव्याच्या डिचोली, सत्तरी, पेडणे, बार्देश आणि फोंडा तालुक्यात राहतात.
सध्या गोव्यात फक्त एकच कर्मचारी राज्य विमा इस्पितळ दक्षिण गोव्यातल्या मडगावमध्ये येथे आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातील विमाधारक कामगारांना उपचारासाठी लांबचा प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचण होत आहे.
खासदारांनी सांगितले, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या १८९ व्या बैठकीत मुळगाव येथे २० हजार२३५ चौरस मीटर (सुमारे ५ एकर) भूखंड खरेदीला १४.१६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या भूमीचा विक्री दस्तऐवज डिसेंबर २०२३ मध्ये तयार झाला आणि गोवा गृह निर्माण मंडळाकडून कर्मचारी राज्य विमा महामंडळाला जमीन ताब्यात देण्यात आली.
मुळगाव येथे प्रस्तावित १५० खाटांचे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे इस्पितळ थेट कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे चालवले जावे व उत्तर गोव्यातील सुमारे १.३५ लाख विमाधारकांना लाभ मिळावा. तसेच, शेजारच्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमाधारकांनाही आरोग्य सेवा मिळेल. सिंधुदुर्गमध्ये सध्या कर्मचारी राज्य विमा इस्पितळ नाही आणि मडगावपासून सुमारे १६० किमी अंतरावर आहे.
...कल्याणासाठी राज्यसभेत मागणी!
खासदार तानावडे यांनी हा प्रकल्प केवळ मागणी नसून, उत्तर गोव्याच्या कामगार विमाधारकांच्या कल्याणासाठी अत्यावश्यक असल्यावर भर दिला. सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य देऊन सर्व प्रलंबित प्रक्रिया, प्रकल्प मंजुरी, कंत्राट मागवणे आणि बांधकाम, तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.