

वास्को : जीममधून घरी परतल्यावर अचानक प्रकृती बिघडलेल्या सडा येथील गौरेश गोपाळ परब (वय २७ वर्षे) या युवकाचा शनिवारी (ता.११) उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्याच्या या आकस्मिक मृत्युबद्दल सडा व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्याच्या पार्थिवावर बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
गौरेश हा वीज खात्याचा कर्मचारी असून तो फातोर्डा-मडगाव विभागात कार्यरत होता. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे जीममधून आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याने मित्राला फोन करून ‘माझ्या छातीत दुखत असल्याने डॉक्टरकडे जाऊ’ असे सांगितले.
मित्र येईपर्यंत तो पलंगावर बसून राहिला. मित्र आल्यावर त्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो अचानक घामाघूम होऊन तेथेच कोसळला. मित्राने त्वरित त्याला कारमधून चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेले. मात्र, तेथे गौरेशला मृत घोषित करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यातआले.
मिळून-मिसळून वागणारा मित्र हरपला
गौरेशच्या पश्र्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. वीज खात्यात कामाला लागून त्याला दोन-तीन वर्षे झाली होती. व्यायामाची आवड असल्याने तो जीममध्ये जात होता. सर्वांशी मिळून-मिसळून वागणाऱ्या गौरीशच्या आकस्मिक निधनाबद्दल मित्रमंडळींमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.