सडा येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव 'सज्ज'

लोकार्पणाची प्रतीक्षा: सडा येथील युवकांना लाभ
Sada International Swimming pool
Sada International Swimming pool Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सडा येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. मुरगावचे माजी आमदार व माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्या प्रयत्नांमुळे सडावासीयांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने सडावासीय व आसपासच्या परिसरातील नागरिक सुखावले आहेत.

हा जलतरण तलाव मुरगाव तालुक्यातील एकमेव तलाव आहे. या तलावामुळे युवकांचे जलतरणपटू होण्याचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे त्याचे लोकार्पण कधी होणार, याची नागरिक वाट पाहत आहेत.

Sada International Swimming pool
संसदीय लोकलेखा समितीची गोवा नौदल क्षेत्राला भेट...

सडा पारावर जलतरण तलावाची उभारणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय धर्तीचा हा जलतरण तलाव राज्यासाठीही भूषण ठरणार आहे.

या तलावातील मुख्य तलाव 50 मीटर लांबीचा व 25 मीटर रुंदीचा आहे. त्याची खोली दोन मीटर आहे. डायव्हिंग पुलाची लांबी 20 मीटर व रुंदी 20 मीटर आहे; तर खोली साडेचार मीटरची आहे. लहान मुलांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी एक मीटर खोल असलेला जलतरण तलाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com