
Russian Tourist Found Dead in Mandrem Goa
मोरजी: सावंतवाडा, मांद्रे येथून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (24 जानेवारी) पहाटे येथील एका खाजगी अपार्टमेंट राहत असलेल्या रशियन पर्यटकाचा दुर्देवी मृत्यू झाला. सर्गेई ब्रॉडस्की, असे या 38 वर्षीय रशियन पर्यटकाचे नाव आहे.
सावंतवाडा येथे राहत असलेला रशियन पर्यटन ब्रॉडस्की सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर चढला होता. त्या ठिकाणी काम करत असतानाच तो कोसळून झाडावर पडला, ज्यामध्ये त्याची कंबर मोडली. त्याने आरडा-आरोड केली असता त्या परिसरात राहणारा एक व्यक्ती तात्काळ त्याच्या मदतीसाठी धावून आला. त्याने तडक 108 नंबरला कॉल करुन रुग्णवाहिका बोलावली. पीडिताला रुग्णवाहिकेने तुये येथील रुग्णालयात (Hospital) हलवण्यात आले, मात्र त्या आगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, मांद्रे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वी, कोरगाव-भटावाडीत झालेल्या दुचाकीच्या अपघातात रशियन पीटर (52) याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. हरमलहून चोपडेच्या दिशेने जाताना त्याची दुचाकी घराच्या संरक्षक कठड्याला धडकली, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, उपचारासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.