मडगाव: शॉर्ट व्हिडिओ आणि रिल्सच्या जमान्यात अनेकजण उत्साहाच्या भरात चित्रविचित्र गोष्टी करताना दिसून येतायेत. Instagram Reels करुन मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळवण्याच्या हव्यासापोटी अनेकजण भलते धाडस करतात.
अशाच प्रकराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रशियन पर्यटकाने गोव्यात केलेल्या जीवघेण्या धाडसाचा आहे.
दक्षिण गोव्याला आणि उत्तर गोव्याला जोडणारा झुवारी पूल केंद्र सरकारच्या वतीने गोव्यात उभारण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजू वातुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुलाचे काम सुरु असताना एका रशियन पर्यटकाने (Russian Tourist) केबलच्या खांबावर चढत जीवघेणा स्टंट केला होता. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फार जुना असला तरी सध्या व्हायरल होत दिसत असून, लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
पुलाचे काम सुरु असताना एवढ्या उंचीवर पर्यटक चढलाच कसा? त्यावेळी पुलावर कोणी सुरक्षा रक्षक नव्हते का? तसेच, पर्यटकावर कारवाई करण्यात आली का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Instagram वर हा एका व्हिडिओ एका व्यक्तीने शेअर केला असून, तो मुंबईतील असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, या रशियन पर्यकाला अटक देखील करण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे.
दरम्यान, अनेकांनी हा व्हिडिओ गोव्यातील (Viral Video Goa) असल्याचे स्पष्ट करत तो झुवारी पुलावरील असल्याचे म्हटले आहे. पण, अशापद्धतीने रिल्सच्या नावाखाली जीव धोक्यात घालून जीवघेणे स्टंट करणे योग्य आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.