Russian national arrest Goa
Russian Arrested With DrugsDainik Gomantak

Russian Arrested In Goa: खून प्रकरणात जामिनावर असलेल्या रशियन नागरिकाचा आणखी एक कांड, ड्रग्ज प्रकरणात मांद्रे पोलिसांकडून अटक

Goa Crime News: संशयित रशियन नागरिक २०१७ पासून हणजूण येथे वास्तव्यास आहे. रशियन महिलेच्या खून प्रकरणात त्याला २०२१ साली अटक करण्यात आली होती.
Published on

मांद्रे: रशियन महिलेच्या खून प्रकरणात जामिनावर असलेल्या रशियन नागरिकाला आता नव्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी हरमल येथे उशीरा रात्री ही कारवाई केली. त्याच्याकडे ३.६५ लाख किंमतीचा चरस, एमडीएमए हा अमली पदार्थ आढळून आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ५१ वर्षीय रशियन नागरिकाला मांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे ३०० ग्रॅम चरस, ६.४५ ग्रॅम एमडीएमए आणि मोबाईल फोन असा ३.६५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक लक्ष्मण देसाई आणि त्यांच्या टीमने हरमल येथे ही कारवाई केली.

Russian national arrest Goa
Underage Girls Assault : ईदच्या पार्टीला बोलावून मित्राने घात केला, बर्थडे केक कापून 2 बहिणींसह एका अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार

संशयित रशियन नागरिक २०१७ पासून हणजूण येथे वास्तव्यास आहे. रशियन महिलेच्या खून प्रकरणात त्याला २०२१ साली अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. जामिनावर असताना देखील त्याची गुन्हेगारी कृत्ये कमी होताना दिसत नसून, तो किनारी भागात अमली पदार्थ विक्री करताना दिसून येत आहे.

संशयित रशियन नागरिकाला अटक करण्यात आली असून, त्याचा हणजूण, कळंगुट. हरमल आणि मांद्रे या किनारी भागात अमली पदार्थ तस्करीत सहभाग दिसून आला आहे. याप्रकरणी मांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com