Watch Video: 'रशियन'च्या नजरेतून 'गोवा दर्शन', 'नमस्ते भैय्या' म्हणत फिरतेय गल्लो गल्ली, पाहा व्हिडिओ

एक रशियन महिला गोव्याचे सौंदर्य व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे.
Russian Mariia chugurova In Goa
Russian Mariia chugurova In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Watch Video: पर्यटनासाठी जगभरात गोवा प्रसिद्ध आहे. गोव्याचे सुंदर समुद्रकिनारे, मनमोहक निसर्ग, प्राचीन कलाकृती, ऐतिहासिक वारसा आणि गोव्याचे खाद्यपदार्थ हे अनुभवण्यासाठी एकदातरी गोव्यात येण्याची प्रत्येकाची इच्छा असते. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक येथे हजेरी लावत असतात. यात रशियन पर्यटकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

अशीच एक रशियन महिला गोव्याचे सौंदर्य व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. विशेष म्हणजे जमेल तसं हिंदी बोलून ती गोव्यातील विविध ठिकाणांना भेट देऊन माहिती घेत आहे.

मारिया चुगुरोवा (Mariia chugurova) असे या रशियन महिलेचे नाव आहे. मारिया चुग या नावाने ती इन्स्टाग्राम अकाउंट चालवते यावरून ती तिचे गोव्यातील प्रवासाचे व्हिडिओ शेअर करत आहे. विविध व्हिडिओच्या माध्यमातून मारिया गोवा दर्शन घडवत आहे.

मारिया पणजीत एका व्हेज रेस्टॉरन्टच्या शोधात आहे. ती रिक्षावाल्या काकांची मदत घेऊन रेस्टॉरन्टला घेऊन जाण्यास सांगते, 100 रूपये भाडे ठरल्यानंतर रिक्षावाले काका तिला रेस्टॉरन्ट जवळ सोडतात. या प्रवासाचा मारियाने व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

तसेच, मारियाने पहिल्यांदाच भारतात येऊन मॅगी खाण्याचा अनुभव देखील व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

पणजी मार्केटमध्ये मक्याचे कणीस खरेदी करताना, मिरामार बीचवर फिरताना तसेच, गोव्यातील चहा आणि इतर खाद्यपदार्थ खाताना मारियाने व्हिडिओ शेअर केले आहेत. या सर्व व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर व्हिवज्, लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत.

मारियाने पणजीतील बालगणेश मंदिरात जाऊन श्रीगणेशाची पूजा केली. याचा देखील व्हिडिओ तिने शेअर केला आहे. बालगणेशाची पूजा करून आशिर्वाद घेतला असे मारियाने या व्हिडिओत म्हटले आहे. विशेष म्हणजे सकाळी सहा वाजता तिने मंदिरात जात पुजा केली.

मारियाचे (Mariia chugurova) इन्स्टाग्रामवर एक लाख 67 हजार फॉलोवर्स आहेत. ती सातत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत असते. तिचे युट्यूब चॅनेल देखील असून तिथे सुद्धा मारिया व्हिडिओ शेअर करत असते.

दरम्यान, मारिया तिच्या व्हिडिओच्या माध्यामातून गोव्याची सकारात्मक बाजू दाखवत आहे. याबाबत स्थानिक गोवेकर मारियाचे कमेन्टमधून आधार मानत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com