Rumdamol Panchayat : धार्मिक कलहाच्‍या नावाखाली राजकीय पाेळी भाजू नका...

रुमडामळ घटनेनंतर चर्चा : पोलिसांनी तारतम्‍य बाळगावे
allegedly attacked by unknown persons
allegedly attacked by unknown personsDainik Gomantak

रुमडामळ-दवर्ली येथील पंच विनायक वळवईकर यांच्‍यावर झालेल्‍या खुनी हल्‍ल्‍यानंतर या परिसरात मोर्चा काढून या विषयाला धार्मिक वळण देण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याच्‍या पार्श्र्वभूमीवर धार्मिक कलहाच्‍या नावाखाली राजकीय पोळी भाजून घेण्‍याची ही तयारी तर नाही ना, असा प्रश्र्न चर्चेत आला आहे. या पार्श्र्वभूमीवर पोलिसांनी हे प्रकरण तारतम्‍य बाळगून हाताळण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जात आहे.

रविवारी जो रुमडामळ भागात मोर्चा काढण्‍यात आला, त्‍यावेळी मुस्लिमांची बिफची काही दुकाने बळजबरीने बंद करण्‍यात आली. त्‍यापूर्वी हे मोर्चेकरी एका धार्मिक स्‍थळावर जमा झाले होते. या बैठकीसंदर्भात कित्‍येकांना व्‍हॉट्‌सॲपवर संदेशही पाठविण्‍यात आले होते. उसगाव, कुंकळ्‍ळी व कुडचडे येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्‍थित होते, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

यात कुडचडे येथील बजरंग दलाचे स्‍थानिक नेते रेकी होन्रेकर, कुंकळ्‍ळी येथील विराज देसाई आदींचा समावेश होता. त्‍यामुळेच नेहमीच अशांत असलेल्‍या रुमडामळ-दवर्ली परिसरात पुन्‍हा एकदा धार्मिक कलह निर्माण करण्‍याची ही पद्धतशीर मोहीम, असा संशय व्‍यक्‍त केला जात असून त्‍यामुळेच या सर्व घटनांची सखोल चौकशी होण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जात आहे.

allegedly attacked by unknown persons
Goa Tree Census: गोवा सरकारला हे काम जमणार का? मुदत संपत आली; 3.9 कोटी वृक्षणगणनेचे आव्हान

असे सांगितले जाते की, या वादाचे मूळ या भागात असलेल्‍या कथित मदरशाशी जुळलेले आहे. हा मदरशा बंद करण्‍याची नोटीस विद्यमान पंचायत मंडळाने जारी करावी, अशी मागणी यापूर्वी याच पंचायतीत विरोधी गटाचे पंच असलेले विनायक वळवईकर यांनी केली होती.

यासंबंधी सत्ताधारी गटाचे पंच आणि माजी सरपंच समीउल्‍ला फणिबंद यांना विचारले असता, या मदरशाला यापूर्वीच्‍या पंचायत मंडळाने ना हरकत दाखला दिला होता. त्‍यावेळी सत्ताधारी गटात वळवईकर हेही होते. या संस्‍थेला प्रत्‍येक वर्षी नव्‍याने असा दाखला दिला जात होता. वळवईकर हे या पंचायतीचे सरपंच झाल्‍यानंतर त्‍यांनी या दाखल्‍याचे नूतनीकरण केले नाही.

मात्र, त्‍यावेळी त्‍यांनी हा मदरशा बंद करण्‍याचाही आदेश जारी केला नाही. जर या मदरशात बेकायदेशीर गोष्‍टी चालू होत्‍या तर वळवईकर हे स्‍वत: सरपंच असताना त्‍यांनी तो बंद करण्‍याचा आदेश का काढला नाही, असा सवाल फणिबंद यांनी केला.

सध्‍या पंचायतीच्‍या आदेशाला या संस्‍थेने गटविकास अधिकाऱ्यांच्‍या कार्यालयात आव्‍हान दिले आहे. त्‍यामुळे हे प्रकरण एकप्रकारे न्‍यायप्रविष्ट झाले आहे. त्‍यामुळे आम्‍ही त्‍यांना मदरशा बंद करण्‍याचा आदेश कसा काय काढू शकतो, असा सवालही त्‍यांनी केला.

allegedly attacked by unknown persons
Dams In Goa: अंजुणे धरणानेही गाठला तळ, चिंता वाढली; केवळ तीनच टक्के पाणी

वादाला अशीही किनार

या वादाला आणखी एक राजकीय किनार आहे ती अशी, पूर्वी ही पंचायत भाजपच्‍या ताब्‍यात होती. मात्र, मागच्‍या पंचायत निवडणुकीत या भागातील सर्व मुस्लिमांनी ठरवून मतदान केल्‍याने ही पंचायत भाजपच्‍या हातातून निसटली. त्‍यानंतरच हे असे प्रकार वाढू लागले आहेत. वास्‍तविक आमदार उल्‍हास तुयेकर यांनी यात हस्‍तक्षेप करून परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍याची गरज आहे, असे फणिबंद यांनी सांगितले

वळवईकर यांच्‍यावर हल्‍ला झाल्‍यानंतर या पंचायतीचे पंच समीउल्‍ला फणिबंद यांच्‍या गाड्याचीही मोडतोड करण्‍यात आली. मात्र, ही मोडतोड केली म्‍हणून कुठल्‍याच मुस्लिमाने मोर्चा काढला नाही. त्‍यामुळे वळवईकर समर्थकांची ही कृती मुद्दामहून धार्मिक तणाव निर्माण करण्‍याची होती, असे म्‍हणण्‍यास वाव आहे.

- उमर पठाण, पंच, रुमडामळ-दवर्ली

सध्‍या संघप्रणित प्रशासनात कट्टर धार्मिक राष्‍ट्रवाद ही संकल्‍पना जाणुनबुजून राबविली जाते. रुमडामळ येथील हा प्रकार त्‍यातलाच एक भाग आहे.

- डॉ. मुकुल रायतूरकर, विचारवंत

अल्‍पसंख्‍याकांना भीतीखाली ठेवून बहुसंख्‍याकांच्‍या मतांचे ध्रुवीकरण करणे ही भाजपाची सध्‍याची पद्धती आहे. गोव्‍यातही ते तीच पद्धत राबवू पाहत आहेत असेच वाटते.

- ॲड. क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो, सामाजिक कार्यकर्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com