Rumdamol Panchayat :'बीफची दुकाने बंद करा, अन्यथा..' हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्यानंतर तोडफोड; महिलेची तक्रार

रुमडामळ मोर्चा प्रकरण ; पंच वळवईकरांसह सातजणांविरोधात तक्रार
Rumdamol panchayat
Rumdamol panchayat Dainik Gomantak

Rumdamol Panchayat : रुमडामळ-दवर्ली येथील पंच विनायक वळवईकर यांच्‍यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दल व अन्‍य हिंदुत्‍ववादी संघटनांच्‍या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी बजरंग दलाच्‍या नेत्‍यांनी प्रक्षोभक भाषणे केल्‍याची तक्रार मायणा-कुडतरी पोलिस स्‍थानकात देण्‍यात आली आहे.

हा मोर्चा काढून या भागातील अल्‍पसंख्‍यांकांवर दबाव आणण्‍याचा हा प्रयत्‍न असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. या प्रकरणी रुमडामळचे पंच विनायक वळवईकर आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते विराज देसाई यांच्‍यासह सात जणांविरोधात अमिषा बेपारी या महिलेने तक्रार दिली आहे.

दरम्‍यान, मडगावचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले,की अद्याप कुणावरही एफआयआर नोंद केलेला नाही. हे प्रकरण हाताळताना पोलिसांनी तत्‍परता दाखवली नाही, यामुळेच या परिसरात धार्मिक तणाव निर्माण झाला, अशी टीका सध्‍या पोलिसांवर होत आहे. मात्र, तपास चालू आहे, एवढेच सांगून पोलिस लोकांची बोळवण करीत आहेत.

Rumdamol panchayat
Paneer Corn Chilli: सकाळच्या नाश्त्यात बनवा पनीर कॉर्न चिली, दिवसभर राहाल एनर्जेटिक

विराज देसाई यांनी रुमडामळ येथील बीफची दुकाने बंद न झाल्‍यास प्रत्‍येक रविवारी आम्‍ही समर्थगडावर जमू, असे भाषण केले होते. तसा व्‍हिडिओ व्‍हायरलही झाला होता. त्‍यानंतर बीफच्‍या दुकानांची माेडतोडही झाली होती.

हा प्रकार धार्मिक तेढ निर्माण करणारा आहे, असे बेपारी यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. देसाई व वळवईकर यांच्‍यासह मंतेश रेगी, उपेंद्र शर्मा, रवींद्र रेडकर, मनोहर उर्फ आपा,अंकिता वळवईकर, दिनेश जामुनी व मिलू बोरकर यांच्‍याविरोधातही तक्रार दिली आहे.

Rumdamol panchayat
Karnataka High Court: विवाहित स्री, विवाहबाह्य संबंध अन् 'तो' आरोप...! तक्रारदार महिलेला कोर्टाची सणसणीत चपराक

डॉ. मुकूल रायतूरकर यांनी रॅलीत जर प्रक्षोभक भाषणे झाली असतील, तर बजरंग दलाच्‍या नेत्‍यांवर कारवाई होण्‍याची गरज असल्‍याचे मत मांडले. शिवाजी महाराजांचे पुतळे काढून टाका, अशा आशयाची पोस्‍ट समाज माध्‍यमावर टाकल्‍यामुळे जर पोलिस वास्‍कोतील युवकाला अटक करत असतील, तर अशी प्रक्षोभक भाषणे करूनही बजरंग दल नेत्‍यांना अटक का हाेत नाही, असा सवाल त्‍यांनी केला.

मदरसा,बीफ दुकानांचीही होणार चौकशी

रुमडामळ येथे चालू असलेला मदरसा बेकायदेशीर असल्‍याचा दावा करुन तो बंद करावा, अशी मागणी वळवईकर आणि इतरांनी केली होती. यावर दक्षिण गोव्‍याचे जिल्‍हाधिकारी आश्‍विन चंद्रू यांनी पोलिस, पंचायत आणि ‘एफडीए’ अधिकाऱ्यांबरोबर आज बैठक घेऊन चर्चा केली.

या कथित मदरशाला दिलेली परवानगी वैध आहे का, याची चौकशी करून अहवाल द्यावा, असा आदेश त्‍यांनी पंचायत सचिवांना दिला. तसेच या भागातील बीफची दुकाने वैध आहेत,का याची चौकशी ‘एफडीए’ने करावी असा आदेश दिला.

Rumdamol panchayat
Film Record Since 91 Years: 211 मिनिटांचा चित्रपट अन् तब्बल 72 गाणी; 91 वर्षांनंतरही 'या' चित्रपटाचा विक्रम अबाधित

आयुब खानची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी

वळवईकर यांच्‍यावर खूनी हल्‍ला केल्‍याचा आराेप असलेला संशयित आयुब खान याची रवानगी मडगाव न्‍यायालयाने आज न्‍यायालयीन कोठडीत केली. आज त्‍याला न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने 14 दिवसांची न्‍यायालयीन कोठडी फर्मावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com