Goa Illegal Madrasa: फ्लॅटमध्ये राहायचे 20 जण, चालायचा बेकायदेशीर मदरसा; रुमडामळ-दवर्लीत 17 अल्‍पवयीन मुलांची सुटका

Rumdamol Davorlim Madrasa: लहानशा फ्‍लॅटमध्‍ये चालू असलेल्‍या एका बेकायदेशीर मदरशावर मायणा-कुडतरी पोलिसांनी छापा टाकून त्‍या मदरशात असलेल्‍या १७ अल्‍पवयीन मुलांची सुटका केली.
Goa Rumdamol Davorlim madrasa raid
Goa Rumdamol Davorlim madrasa raidDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Madrasa Raid News

मडगाव: रुमडामळ-दवर्ली येथे एका लहानशा फ्‍लॅटमध्‍ये चालू असलेल्‍या एका बेकायदेशीर मदरशावर मायणा-कुडतरी पोलिसांनी छापा टाकून त्‍या मदरशात असलेल्‍या १७ अल्‍पवयीन मुलांची सुटका केली.

ही मुले गोवा, कर्नाटक व महाराष्‍ट्रातील असून त्‍यांना दाटीवाटीने या फ्‍लॅटमध्‍ये ठेवण्‍यात आले होते, अशी माहिती मायणा-कुडतरी पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, मौलाना तौकीब आलम नावाची व्‍यक्‍ती हा मदरसा चालवीत होती.

Goa Rumdamol Davorlim madrasa raid
Goa Crime: खंडणीखोर 'वॉल्‍टर गँग'च्या म्‍होरक्‍याला अटक! मुंगूलमध्ये झाला होता खुनी हल्ला; गन आणि गोळ्या जप्त

तिथे त्‍यांच्‍यासह आणखी दोन शिक्षक आणि १७ मुले अशी एकूण २० लोक दाटीवाटीने रहायचे. एकाच्‍यावर एक अशा चार स्‍तरीय खाट तयार करून या मुलांना तिथे झोपविले जायचे. तिथे त्‍यांची कोंडवाड्यात ठेवल्‍यासारखी स्‍थिती झाल्‍याने त्‍यांना बाहेर काढून अपना घरमध्‍ये ठेवण्‍यात आले आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.

Goa Rumdamol Davorlim madrasa raid
Goa Crime: ..बऱ्या बोलाने 2 कोटी रुपये द्या! 'वॉल्टर' नावाचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; संशयितांविरुद्ध तक्रार दाखल

या मदरशाला कुठल्‍याही प्रकारचा परवाना नव्‍हता. आम्‍ही परवान्‍यासाठी अर्ज केला आहे, असे त्‍या मौलानाने आम्‍हाला सांगितले. मात्र त्‍यासाठी तो कसलीही कागदपत्रे सादर करू शकला नाही, असे गावस देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com