Banyan Tree Collapsed: 100 वर्षे जुना वटवृक्ष कोसळला! रूमड-पाळीत 4 गाड्यांचा चकणाचूर, 2 घरांचे नुकसान

Rumad Pali banyan tree collapsed: रूमड - पाळीत पहाटे चारच्या सुमारास शंभर वर्षे जुना वटवृक्ष कोसळल्यामुळे या दोन कारगाड्या, दोन दुचाक्यांसहीत दोन घरांचे नुकसान झाले.
Rumad Pali Goa old banyan tree collapsed
Rumad Pali Goa old banyan tree collapsedDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: रूमड - पाळीत पहाटे चारच्या सुमारास शंभर वर्षे जुना वटवृक्ष कोसळल्यामुळे या दोन कारगाड्या, दोन दुचाक्यांसहीत दोन घरांचे नुकसान झाले. साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा वटवृक्ष दिवसा कोसळला असता तर जीवितहानी होण्याचा धोका होता, तो टळला.

हा वटवृक्ष फार जुनाट असून बाजूला घरे आहेत. या ठिकाणी वाहने पार्क केली जातात. रात्री येथील नागरिकांनी आपली वाहने पार्क केली होती, मात्र पहाटे भला मोठा आवाज झाला त्यावेळी सर्वजण घराबाहेर धावून आले. या भला मोठा वटवृक्ष कारगाड्या तसेच दुचाक्यांवर कोसळला.

Rumad Pali Goa old banyan tree collapsed
Coconut Tree Disease: शेतकऱ्यांवर मोठे संकट! गोव्यातील काही भागात रोगाची संक्रांत; नारळाची झाडे लागली सुकू, Video

स्थानिक पंचसदस्य प्रसाद सावंत यांनी त्यानंतर लगेच अग्निशामक दलाशी संपर्क साधल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन वटवृक्ष बाजूला करण्याच्या कामाला सुरवात केली.

Rumad Pali Goa old banyan tree collapsed
Trees in Goa: ब्राझीलमधून काजू, मोगल बादशहांमुळे अनेक वनस्पती भारतात आल्या; गोव्यातील वृक्षारोपणाची परंपरा

दरम्यान, पाळी पंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी धोकादायक झाडे असून ही झाडे केव्हाही कोसळण्याचा धोका आहे, त्यामुळे अग्निशामक दल तसेच आपत्तीनिवारण कक्षाने यासंबंधी त्वरित दखल घेऊन अशी झाडे दूर करवीत, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com